फुग्यांच्या खेळातून मूल्ये
फुग्यांच्या खेळातून मूल्ये
उद्देश्य:
मुलांमध्ये शिस्त हा गुण रुजविणे आणि कोणतेही कार्य पार पाडताना शिस्त व संघ-भावना यांचे किती महत्व असते ते मुलांना समजविणे हा या उपक्रमाचा हेतू आहे.
संबंधित मूल्ये:
- शिस्त
- समस्या सोडविणे
- निर्णय घेणे
- सांघिक मैत्री
- वाटणी आणि आस्था
साहित्य:
- फुगे
- स्केच पेन्स
- टब/बादली/ जूट बॅग
खेळ कसा खेळावा
- गुरूने प्रत्येक मुलाला फुगा व स्केच पेन द्यावे.
- या नंतर गुरूने मुलांना आपापला फुगा फुगवून त्यावर स्केच पेनने ठळक अक्षरात आपले नाव लिहिण्यास सांगावे.
- आता गुरूने एका मुलाला सर्व फुगे गोळा करून ते एका टब/बदली/जूट-बॅग या मध्ये ठेवण्यास सांगावे.
- गुरूंनी तीन टाळ्या वाजवून इशारा करताच सर्व मुलांनी लगेच, फुगे ठेवलेल्या बादलीजवळ जावे. आपले नाव असलेला फुगा घ्यावा व परत जागेवर जाऊन बसावे.
- प्रत्येक मूल जेव्हा स्वतःच्या नावाचा फुगा शोधण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तिथे खूप गोंधळाचे आणि बेशिस्तीचे वातावरण निर्माण होईल.
- हा गोंधळ शांत झाल्यानंतर आणि प्रत्येक मूल आपल्या फुग्यासहित आपल्या जागेवर बसल्यानंतर गुरूने मुलांना विचारावे की हा उपक्रम शिस्तबद्ध पद्धतीने आणि कमी वेळात राबविण्याचा मार्ग शोधता येईल का?
- एक सूचना अशी आहे- जर ‘य’ मुलाला ‘झ’ मुलाचा फुगा मिळाला तर ‘य’ हे मूल तो फुगा टाकून देऊन स्वतःचा फुगा शोधत बसण्यापेक्षा तो फुगा ‘झ’ ला देऊ शकते.
- वरील सूचनेला सर्वात जास्त गुण मिळतील.
गुरूंसाठी सूचना:
- फुग्यांऐवजी बालविकास-मुलांच्या वह्या गोळा करून टब/बादली मध्ये ठेवता येतील.