बुद्ध महावीर येशू साई
भजनाचे बोल
- बुद्ध महावीर येशू साई
- वाहे गुरु वाहे गुरु बोल मनवा
- अल्ला येशु सद्गुरु साई
- गीता वेद कुरान हो साई
- तनमे साई मनमे साई
- रोम रोम मे साई साई
- वाहे गुरु वाहे गुरु बोल मनवा
अर्थ
हे मना! वाहे गुरु वाहे गुरु चे उच्चारण कर. गीता कुराण आणि बायबल ह्या धर्मग्रंथांचे सार असणाऱ्या बुद्ध, महावीर, येशू आणि सद्गुरू साई ह्यांच्या नामांचे उच्चारण कर. हे साई! आपण देहामध्ये, मनामध्ये वास करता आणि शरीरातील प्रत्येक अणु रेणू मध्ये तुम्ही भरून राहिला आहात.
स्पष्टीकरण
बुद्ध महावीर येशू साई | हे विश्वेश्वरा! बुद्ध,महावीर,येशू आणि साई अशा विविध नामांनी आम्ही तुझे स्तुतिगान करतो. |
---|---|
वाहे गुरु वाहे गुरु बोल मनवा | प्रत्येकामध्ये सद्गुरूंच्या रूपाने निवास करणाऱ्या निर्गुण निराकार परमेश्वराचे आपण नामोच्चारण करूया. |
अल्ला येशू सद्गुरु साई | हे प्रभू साई! तुम्ही सद्गुरु आहात आणि अल्ला, येशूही तुम्हीच आहात. |
गीता, वेद, कुरान हो साई | हे प्रभु साई! तुम्ही भगवद् गीता, वेद व कुराण या सर्व धर्मग्रंथांचे सार आहात. |
तनमे साई मनमे साई | आमचा देहातील प्रत्येक अणु रेणू मध्ये तुम्ही विद्यमान आहात आणि आमच्या मनाला प्रोत्साहित करता. |
रोम रोम मे साई साई | माझ्या रोमा रोमात तुमची स्पंदने निनादतात. |
वाहे गुरु वाहे गुरु बोल मनवा | प्रत्येकामध्ये सद्गुरूंच्या रूपाने निवास करणाऱ्या निर्गुण निराकार परमेश्वराचे आपण नामोच्चारण करूया |
राग: शंकरा भरणं आणि हरि कम्बोजी रागाची झलक
श्रुती: सी (पंचम)
ताल: कहरवा किंवा आदि ताल आठ मात्रा
Indian Notation


Western Notation


Adopted from : https://archive.sssmediacentre.org/journals/vol_12/01OCT14/Buddha-Mahaveer-Yeshu-Sai.htm