श्री सत्य साई सुप्रभातम (कडवे ३)

Print Friendly, PDF & Email
श्री सत्य साई सुप्रभातम (कडवे ३)
ऑडिओ
श्लोकाचे बोल
  • चित्रावती तट विशाल सुशान्त सौधे
  • तिष्ठन्ति सेवक जनास्तव दर्शनार्थम्
  • आदित्य – कान्तिरनुभाति समस्त लोकान्
  • श्री सत्य साई भगवन्, तव सुप्रभातम्
अर्थ

चित्रावतीच्या किनार् यावर असलेल्या, प्रशांतीने युक्त अशा भव्य महालाच्या भोवती तुझ्या दर्शनासाठी सेवक जन थांबले आहेत. सूर्याचा प्रकाश पसरत आहे आणि जगाला प्रकाशित करीत आहे. आमचे दिव्यत्वाचे ज्ञान जागृत होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो.

स्पष्टीकरण
चित्रावती पुट्टपर्तीतून वाहणारी नदी
तट नदीचा किनारा
विशाल मोठा, विस्तीर्ण
सुशान्त अत्यंत शांत
सौधे सौधावर – सज्जावर, शुचिर्भूत स्थळी
तिष्ठन्ति थांबले आहेत
सेवकजना चाकर, भक्त
तव दर्शनार्थ तुझ्या दर्शनासाठी
आदित्य सूर्य
कान्ति तेज
अनुभाति प्रकाशित
समस्त सर्व
लोका जग
श्री सत्य साई भगवान हे प्रभू भगवान श्री सत्य साई
तव सुप्रभातम ह्या शुभ प्रभातीस (मंगल प्रभातीस), मी तुम्हाला वंदन करतो
श्री सत्य साई सुप्रभातम (चित्रावती तट …)
स्पष्टीकरण :

आता पहाट झाली आहे. ज्ञानाच्या सूर्याने अज्ञानाच्या गाढ झोपेतून आम्हाला उठविले आहे. सत्य साई बाबांच्या रूपाने आलेल्या भगवंताने सद्गुरू म्हणून आमच्या जीवनात प्रवेश केला आहे. पाप आणि दुष्प्रवृत्ती किंवा काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर या सारख्या वासनांनी भरलेले मन आता त्यांच्या जागी सत्य, धर्म, शांती व प्रेम यांसारख्या सद्गुणांना स्थान देत आहे. जेव्हा दिवस उजाडतो तेव्हा निशाचर पक्षी व त्रासदायक कीटक पळून जातात, कारण दिवसाचा उजेड ते सहन करू शकत नाहीत.

आता आपल्या दहा इंद्रियांना स्वच्छंदी मनाचे नव्हे तर बुद्धीचे मार्गदर्शन मिळत आहे.

आता आपण अन्नमय कोशाकडून आत आत्म्याकडील प्रवास सुरु करीत आहोत.

गर्भितार्थ :

माझ्या अस्तित्वाचे तेजस्वी, दिव्य सत्य, माझ्या जाणिवेत प्रकट हो आणि माझे अस्तित्व तुझ्या दिव्य प्रकाशाने भरून टाक म्हणजे माझी इंद्रिये त्यांचा दिव्य हेतू पूर्ण करु शकतील आणि माझे अस्तित्व शांतीने भरून जाईल, भगवंताचे दर्शन हा एक आंतरिक अनुभव आहे.

पण एका शास्त्रज्ञ डॉ. फ्रॅंक बॅरानॅास्कीने दाखवून दिले आहे की सुंदर रंगांनी युक्त असलेली स्वामींची प्रभावळ आपण पाहू शकतो. त्याने कर्लियन कॅमेरा वापरला होता. त्याने काढलेल्या छायाचित्रात बाबांच्या आकृतिपासून क्षितिजापर्यंत पसरलेले पांढरे, गुलाबी, निळे, सोनेरी व चंदेरी शक्तीचे पट्टे दिसत होते. त्याने असे म्हटले आहे की पृथ्वीवरील कोणत्याही व्यक्तीची अशी प्रभावळ त्याने यापूर्वी पाहिलेली नव्हती.

पूज्य व्यक्तीच्या दर्शनाचा गर्भितार्थ :

“दर्शनं पापनाशनम्” अशी एक म्हण आहे. म्हणजे पूज्य व्यक्तीच्या दर्शनाने आपली पूर्वीची पापे नष्ट होणार आहेत किंवा दूर केली जाणार आहेत. कशी? डॉ. फ्रॅंक बॅरानॅास्की यांच्या व्यक्तिगत अनुभवाने असे दाखवून दिले आहे की पवित्र व्यक्तीच्या शरीरातून प्रचंड प्रकाश निर्माण होत असतो. साईंचे दर्शन भक्तांना प्रेम, शांती व आनंदाच्या किरणात न्हाऊ घालते आणि आपल्या आत्म्यापासून ही तसाच प्रकाश निर्माण होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: