धन्य हो ईश्वरांबा
भजनाचे बोल
- धन्य हो ईश्वराम्बा
- जग को दिये जो लाल बाबा
- धन्य हो धन्य हो
- कलियुग मे अवतार लिये
- सकल चराचराके भगवान
- जगदोद्धारा साई नारायणा
- धन्य हो धन्य हो
अर्थ
हे पावन ईश्वराम्मा तुमचा जयजयकार असो, तुम्ही या सांप्रत कलियुगामध्ये, अखिल जगतास भगवान साईंची भेट दिली आहे. भगवान साई, सर्वव्यापी भगवान नारायणच आहेत आणि मानवजातीस मुक्त करण्यासाठी ते येथे आले आहेत.
स्पष्टीकरण
धन्य हो ईश्वर आंबा | परमेश्वराने त्याच्या स्थूल रूपासाठी, माता म्हणून निवडलेल्या आशीर्वादित ईश्वराम्मांचा जयजयकार असो! |
---|---|
जग को दिये जो लाल बाबा | जगातील लक्षावधी लोकं, ज्यांना साईबाबा म्हणून पुजतात, त्या प्रिय प्रभूंची अखिल जगतास, भेट देणाऱ्या ईश्वराम्मांचा जयजयकार असो! |
धन्य हो धन्य हो | दिव्यत्वाच्या मातेचा जयजयकार असो! |
कलियुगमे अवतार लिये | ह्या कलियुगामध्ये, मानवी रूपात अवतरलेल्या निर्गुण निराकार परमेशाचा जयजयकार असो! |
सकल चराचर के भगवान | हे प्रभू, तू सर्वांना चैतन्यमय बनवतोस आणि विश्वातील चराचराचे नियमन करतोस. |
जगदोद्धारा साई नारायणा | मानवतेच्या उद्धारासाठी, साई नारायणाच्या रूपाने अवतरीत झालेल्या भगवान नारायणाचे स्वागत असो! |
धन्य हो धन्य हो | दिव्यत्वाच्या मातेचा जयजयकार असो! |
राग: सिंधू भैरवी
श्रुती: डी (पंचम)
ताल: कहरवा किंवा आदि ताल – आठ मात्रा
Indian Notation
Western Notation
Adopted from : https://archive.sssmediacentre.org/journals/vol_12/01MAY14/Dhanyaho-Eswaramba-radiosai-bhajan-tutor.htm