सद्सद्विवेकबुद्धी

Print Friendly, PDF & Email

सद्सद्विवेकबुद्धी

उद्दिष्ट:-

परमेश्वर, पालक, गुरु आणि शिक्षक तुम्हाला योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करतात, म्हणून तुम्ही त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. ह्या उपक्रमातून मुलांच्या मनावर हे ठसवणे हे ह्या खेळाचे उद्दिष्ट आहे.

संबंधितमूल्ये
  • जागरुकता
  • स्मरणशक्ती,
  • सद्सद्विवेकबुद्धी
खेळ कसा खेळावा
  1. मुलांना एका रांगेत उभे करावे.
  2. हा खेळ ‘आज्ञेचे पालन’ ह्याविषयी असल्याचे गुरुंनी मुलांना सांगावे.
  3. ह्या खेळाविषयी स्पष्टीकरण देताना गुरुंनी मुलांना सांगावे की ज्या आज्ञेच्या अगोदर, परमेश्वर/ आई/ बाबा/ गुरु/शिक्षक म्हणतात असे शब्द असतील केवळ त्याच आज्ञेचे पालन करावे.
  4. गुरु, परमेश्वर म्हणतो – “हस्तांदोलन करा.”
  5. आई म्हणते, “हसा” अशा आज्ञांचे पालन करावे.
  6. ह्याची दुसरी बाजू, जर केवळ “खाली बसा”‘ अशी आज्ञा असेल तर त्या आज्ञेचे पालन न करता मुलांनी उभे राहिले पाहिजे.
गुरुंना सूचना:
  • गुरुंनी दिलेल्या आज्ञा मुलांमध्ये मूल्यांचे संवर्धन करणाऱ्या असाव्यात.
  • गुरुंनी नकारात्मक आज्ञा देऊ नयेत.