सावकाश चालवा सुरक्षित पोचा

Print Friendly, PDF & Email
सावकाश चालवा सुरक्षित पोचा
उद्देष:

पेन्सिल आणि नाणे ह्यांचा खेळ, मजेने भरलेला उपक्रम असून यात गुरुत्व, तराजू, प्रमाणबध्दता आणि दृश्य डोळ्यासमोर आणणे.

संबंधित मूल्ये:
  • एकाग्रता
  • संयम
  • स्थिरता
  • निर्धार
  • प्रश्न सोडवणे
आवश्यक साहित्य:
  1. दहा एक रुपयाची सारख्या आकाराची नाणी
  2. एक पेन्सिल एका टोकाला सपाट.
  3. मोठ्या बटाट्याचा अर्धा तुकडा
  4. ताटली
  5. स्टॉपवॉच
कसे खेळायचे:
  1. गुरुंनी मुलांना खेळ समजावून सांगणे.
  2. प्रत्येक मुलाने त्याच्या तातलीत अर्धा कापलेला बटाटा ठेवायचा.
  3. मुलाने पेन्सिलच्या टोकाकडून पेन्सिल बटाट्यात खुपसायची (पेन्सिल स्टैंड सारखे दिसेल)
  4. दहा नाणी एकावर एक अशी सावकाश पेन्सिलच्या सपाट टोकावर ठेवायची
  5. असे करताना काही नाणी खाली पडली तरी मुले पुढे लावायचा प्रयत्न करु शकतात.
  6. हा खेळ सगळ्या मुलांनी एकाच वेळी गुरु सांगतील तेव्हा सुरु करायचा आहे.
  7. जो प्रथम दहा नाणी दिलेल्या वेळात लावून’पूर्ण करेल तो विजेता.
संबंधित वाक्प्रचार, वचने
  • अती घाईने सारे मुसळ केरात
  • संयम आणि स्थिर बुद्धीने शर्यत जिंकता येते.
  • घाईने आमटीसुद्धा बिघडते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: