दुपाती तिरुमलाचार्यांबद्दल स्वामींचे मनोगत
दुपाती तिरुमलाचार्यांबद्दल स्वामींचे मनोगत
श्री सत्य साई सुप्रभातामचे लेखक दुपाती तिरुमलाचार्यइथे रहात होते. त्यांनी वेंकटगिरीच्या राजदरबारात नोकरी केली होती. ते संस्कृत आणि शास्त्रांचे महान पंडित होते. वयाच्या नव्वददीमध्ये ते माझ्याबरोबर बद्रीनाथाच्या यात्रेमधे शामील झाले होते.
मी त्यांना विचारले तुम्ही एवढ्या कठीण यात्रेसाठी पुरेसे शारिरीक तंदुरुस्त आहात का? त्यांनी उत्तर दिले,स्वामी बरोबर असताना कुठल्याच कठीण प्रवासात मला कसलाही त्रास होणार नाही. ते म्हणाले, “साईमाता, जर आपण माझा त्याग केलात तर माझ्या अस्तितवाला काहीच अर्थ नाही. जर तुम्ही मला स्विकार केलात तर प्रत्येक गोष्ट माझ्या अधिपत्याखाली असेल.” अशा प्रकारच्या श्रेष्ठ भक्तीच्या आणि समर्पणाच्या अवस्थेत त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले. दुपाती तिरुमलाचार्य अखंड साईमातेचे चिंतन करत असत.
त्यांनी कायम इथे किंवा वृन्दावनात सुद्धा स्वामींच्या सानिध्यात आपला काल व्यतीत केला. त्यांच्या भक्तीचे मोजमाप करता येणे शक्य नाही. त्यामुळे पुढे त्यांचा अंत अत्यंत शांतपणे झाला. त्यांचा अंतकाळ जवळ येत असल्याचे त्यांनी जाणले होते आणि त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
जेव्हा कुणी त्यांना याबद्दल विचारले तेव्हा ते उत्तरले की, “स्वामी मला माझ्या अंतर्मनात हे सांगत आहेत.” असे सांगून ते स्नानाला गेले. येताना थोड़े पाणी घेवून आले. आल्यावर त्यांनी स्वामींचे चरण धुवून त्याचे तीर्थ प्राशन केले. त्यानंतर ते म्हणाले, “स्वामी मी माझ्या आयुष्यात आता पूर्ण समाधानी आहे. तेव्हा तुमच्यात विलीन होण्याचा समय आला आहे. असे म्हणून त्यांनी देहाचा त्याग केला. आणि स्वामीमध्ये विलीन झाले. अशा प्रकारच्या भक्तांची जगामधे कमी नाही. अशा भक्तांच्या अस्तित्वामुळेच जग तरुन जाते.
[Source: Sports Meet Discourse 2000]