श्री सत्य साई सुप्रभातम (कडवे १)

Print Friendly, PDF & Email
श्री सत्य साई सुप्रभातम (कडवे १)
ऑडिओ
श्लोकाचे बोल
  • ईश्वराम्बासुत श्रीमन्
  • पूर्वा संध्या प्रवर्तते
  • उत्तिष्ठ सत्यसाईश
  • कर्तव्यं दैव दैवमाह्निकम्
अर्थ

हे ईश्वराम्मासुत, दैवी उदात्त पुत्रा.पूर्वेकडे सूर्योदय होत आहे.नित्याची दैवी कामे तुम्हाला करावयाची आहेत.म्हणून हे सत्य साई प्रभू, जागे व्हा.

स्पष्टीकरण
ईश्वराम्बा माता ईश्वराम्मा
सुत मुलगा
श्रीमन् तेजस्वी, भव्य, उदात्त, ऐश्वर्यशाली
पूर्वा पूर्व दिशा
संध्या सूर्योदय
प्रवर्तते प्रारंभ होतो आहे
उत्तिष्ठ उठा, जागे व्हा
सत्य साईश हे प्रभू भगवान सत्य साई
कर्तव्यम् कर्मे
दैवं दैवी
आह्निकं दैनंदिन कर्तव्ये
श्री सत्य साई सुप्रभातम – संदेश

पहाटेच्या वेळी सुप्रभातम म्हणताना परमेश्वर आपल्या आतमध्ये आहे हे आपण जाणले पाहिजे.

आपल्या इन्द्रियांद्वारे तोच सर्व काम करणार आहे. ती कर्म अशी असावित की ज्यांना परमेश्वरी कर्म म्हणता येईल. प्रत्येक वेळी बालकाने, कोणतेही कर्म करताना वा कोणताही विचार करताना, जर त्याने माझा प्रभु परमेश्वर माझ्या आतमध्ये आहे ह्याचे स्मरण ठेवले तर तो असे कर्म करेल जसे मी करतो? तो असा विचार करेल जसा मी करतो? असे केल्यास त्याला उचित कर्म करण्यास मार्गदर्शन मिळेल. पहाटेच्या वेळी दिवस सुरु होताना आपण हे सुप्रभातम म्हणून परमेश्वर आपल्यामध्ये विद्यमान आहे ह्याचे स्वतःला स्मरण करून दिले पाहिजे. आपण सर्वजण त्या अमृतत्वाचे पुत्र असल्यामुळे ईश्वरम्मा सूत ह्या संज्ञेचा संदर्भ आपण सर्वांसाठी आहे. पुट्टपर्ती म्हणजे आपले देह. उत्सुकतेने प्रतिक्षा करणारे भक्त म्हणजे आपली इद्रिये. फळे आणि फुले अर्पित करणे म्हणजे आपल्या कर्मांचे समर्पण सीतेसह विरुध्द असणाऱ्या स्त्रिया म्हणजे आपल्यामध्ये असणाऱ्या इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, विचारशक्ती, वाकशक्ती इ. शक्ती नारीतत्वाचे स्वरुप आहेत. शक्ती नारीतत्वाचे प्रतिनिधित्व करते. अशा तऱ्हेने जर आपण आपल्या अंतर्यामी असणाऱ्या परमेश्वरास जागृत करण्याचा प्रयत्न केला, त्याचे अस्तित्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपण त्याच्या ज्ञान, विज्ञान, सुज्ञान आणि प्रज्ञान ह्याने दैदिप्यमान असलेल्या परमधामास पोहचू व आपणास मोक्षप्राप्ती होईल. हा सुप्रभातामचा संदेश आहे.

[Source: श्री सत्य साईं बाल विकास मार्गदर्शिका – २ – गट २ श्री सत्य साई बुक्स एण्ड पब्लिकेशन्स ट्रस्ट]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *