गोविंद कृष्ण – उपक्रम

Print Friendly, PDF & Email
उपक्रम : हस्तकला – जुन्या वर्तमानपत्रांपासून कृष्णाची बासरी बनविणे

साहित्य :
  • वर्त्तमान पत्रांचे १० कागद
  • कापड/ अस्तर/ पेपर
  • सोनेरी धागा
  • सुई, दोरा, मणी
  • पट्टी, पेन्सिल, ग्लू
पद्धत :
    1. वर्तमानपत्रांचे पांच कागद घ्या आणि ते एकावर एक ठेवा.
    2. आता मध्ये छडी घाला आणि उघड्या बाजूकडून बंद बाजूकडे त्याची गुंडाळी करा.
    3. ग्लू लावून गुंडाळी चिकटवून टाका.
    4. ही बासरी ३६ से.मी. लांब आहे. पट्टी व पेन्सिल घ्या. ८ से. मी. वर, ११ से. मी. वर, १४ से. मी. वर व १८ से. मी. वर गोल काढा.
    5. आता कात्री घ्या (मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली) आणि हे गोल कापून काढा.

संपूर्ण कापले नाहीत तरी चालेल आणि मागची बाजू कापू नका. या छिद्रांमध्ये पेन्सिल घाला आणि ती थोडी मोठी करा.

  • बासरीच्या लांबी इतके छान कापड घ्या. त्यावर बासरीवर आहेत तेवढ्याच अंतरावर गोल काढा आणि छिद्रे करा आणि ते कापड बासरीवर चिकटवा.
  • गोळे बनविण्यासाठी एक थर्मोकोलचा गोळा घ्या आणि त्यामधून दोरा ओवा. त्यावर छान कापड चिकटवा, मग दोऱ्यामध्ये मणी ओवा.
  • बासरीच्या एका टोकाला आणि मध्ये अस्तराच्या पट्ट्या किंवा लेस चिकटवा.
  • गोंड्याचा दोरा अस्तराची पट्टी/ लेस वर चिकटवा आणि बासरीच्या दुसऱ्या टोकावर चिकटवून टाका.
  • आता सोनेरी दोरा घ्या आणि छिद्रांच्या भोवती लावून टाका.
  • बासरी तयार झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: