दयाळूपणे प्रकाशाकडे घेऊन जा
दयाळूपणे प्रकाशाकडे घेऊन जा
उद्दिष्ट:
डोळ्यावर पट्टी बांधून खेळला जाणारा हा एक वेगळा खेळ आहे. या खेळामधून खेळाडूला समृद्ध करणारे अनुभव प्राप्त होतात.
डोळ्यावर पट्टी बांधलेला एक मुलगा त्याच्या सोबत्याच्या सहाय्याने ध्येयाप्रत कसा पोहोचतो हे ह्या खेळामधून दर्शवले जाते. हा खेळ एकमेकांविषयी विश्वास, सहानुभूती त्याचबरोबर श्रवण आणि संवाद कौशल्याला प्रोत्साहित करतो.
संबंधित मूल्ये:
- सहकार्य
- सांघिक कार्य
- विश्वास
- सहानुभूती
साहित्य:
- डोळ्यावर बांधायच्या पट्टया-२
- खोकी, खुर्च्या, पुस्तके, टेबल, बॅट, फुटबॉल, बादली इ. विविध अडथळे
खेळ कसा खेळावा
- गुरुंनी वर्गातील मुलांचे दोन संघ बनवावेत.
- गुरूंनी हॉलमध्ये किंवा बाहेर वर निर्देश केलेल्या वस्तू क्रमवार न ठेवता,कुठेही इकडे तिकडे ठेवाव्यात.
- एका संघातील खेळाडूच्या डोळ्यावर पट्टी बांधावी आणि त्यावेळी तो खेळाडू अडथळ्यांच्या रचनेच्या प्रारंभ बिंदूपाशी उभा असायला हवा.
- दुसऱ्या सदस्यानी पट्टी बांधलेल्या खेळाडूला दिशा सांगून मार्गदर्शन करावे. (उदा. सरळ जा, डावीकडे वळ इ.)
- डोळ्यावर पट्टी बांधलेल्या खेळाडूनी केवळ त्याच्या सोबत्याच्या दिशा दिग्दर्शनानुसार, निश्चित केलेल्या कालावधीमध्ये यशस्वीपणे हॉलमधून संचार करून अंतिम बिंदूपर्यंत पोहोचले पाहिजे.
- दुसऱ्या संघातील दोन खेळाडूंनी याची पुनरावृत्ती करावी.
- अखेरीस, ज्या संघातील जास्त जोड्या त्या कालावधीमध्ये अंतिम बिंदूपर्यंत पोहचतील तो संघ विजयी ठरेल.
गुरूंसाठी सूचना:
- डोळ्यावर पट्टी बांधलेला मुलगा आणि त्याचा मार्गदर्शक या दोघांच्या भूमिकांची गुरुंनी अदलाबदल करावी.
- अशा तऱ्हेने त्यांना दोन्ही भूमिकांमधील वेगवेगळे अनुभव घेणे शक्य होईल. उदा.जेव्हा तो पाहू शकत नाही तेव्हा त्याला कसे वाटते (असहाय्य, असुरक्षित, उद्विग्न इ. अवस्थेतून) आणि नंतर जेव्हा त्याच्या मार्गदर्शकाकडून त्याला स्पष्ट मार्गदर्शन मिळते(आशा, विश्वास, आत्मविश्वास, कृतज्ञता आणि निर्धार इ.)
- त्यानंतर, मार्गदर्शकाच्या भूमिकेत असताना त्याच्या मनात सहानुभूती, करुणा, आस्था, सोबत्याची काळजी घेणे इ. भाव निर्माण होऊ शकतात. आणि त्यामधून आत्मसंतोष आणि आंतरिक आनंद प्राप्त होऊ शकतो.
- हा मनाला आकर्षित करणारा एक सांघिक खेळ आहे ज्या मधून मुलांना खूप मोठ्या प्रमाणावर अनुभवजन्य ज्ञान मिळते!