श्री सत्य साई सुप्रभातम (कडवे १०)

Print Friendly, PDF & Email
श्री सत्य साई सुप्रभातम (कडवे १०)
ऑडिओ
श्लोकाचे बोल
  • मंगलं गुरु देवाय, मंगलं ज्ञानदायिने ।
  • मंगलं पर्तिवासाय, मंगलं सत्यसाईने ।।
अर्थ

आमचे सद्गुरू आमचे मंगल करू देत. ते आम्हाला दिव्य शहाणपण देऊ देत. पुट्टपर्तीत अवतरलेले आमचे गुरु आमच्यावर कृपा करू देत. सद्गुरू श्री सत्य साईंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

स्पष्टीकरण
मंगलं शुभ्र, पवित्र, मंगल
गुरु देवाय जे दैवी गुरु किंवा दिव्या गुरु आहेत ते
ज्ञानदायिने जे आपल्याला सूज्ञता / ज्ञान देतात ते
पर्तिवासाय पर्तिचे निवासी
सत्यसाईने जे श्री सत्य साई आहेत ते
श्री सत्य साई सुप्रभातम (मंगलं गुरु देवाय…)
स्पष्टीकरण :

आमचे सद्गुरू आमचे मंगल करू देत.
ते आम्हाला दिव्य शहाणपणा देऊ देत.
पुट्टपर्तीत अवतरलेले आमचे गुरु आमच्यावर कृपा करु देत.
भगवान श्री सत्य साई बाबा आम्हाला आशीर्वाद देऊ देत.
हे दिव्य सद्गुरू आम्हाला श्रेष्ठ बुद्धी द्यावी आणि विशुद्ध ज्ञान द्यावे जे आम्हाला सत् चित्, आनंदाकडे घेऊन जाईल.
या शेवटचा ओळीमध्ये सुंदर लय आहे आणि या ओळींचा मंत्र म्हणून स्वीकार करु शकतो.
ज्योतिस्वरुप, पर्तीच्या परमेश्वरा, सद्गुरू श्री सत्य साईंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

गोष्ट :

ज्यावेळी बाबा फक्त नऊ वर्षांचे होते त्यावेळी विचित्र पद्धतीने वागणाऱ्या लोकांविरुद्ध ते धाडसाने साहसी लयबद्ध वात्रट कविता करीत असत. उदाहरणार्थ, त्या गरीब गावात हिटलरसारख्या मिश्या ठेवणाऱ्या लोकांविरुद्ध अथवा परदेशी थाटाचे कपडे वापरणाऱ्या लोकांविरुद्ध ते कवने करीत. ते स्वत: स्वरचित अनुप्रासयुक्त कविता रचीत ज्यामध्ये विलासी जीवन जगणाऱ्या आळशी श्रीमंतांवर टीका असे, तर रणरणत्या उन्हात काम करणाऱ्या त्यांच्या गरीब नोकरांबद्दल करुणा असे. अशाप्रकारे खोडसाळ परंतु सत्य गीतांचा रचनाकार कोण याची चौकशी होत असे. सत्या जातीयतेने उत्पन्न होणाऱ्या क्रूरतेबद्दल लिहीत असे. अशावेळी कोणीही त्याला गप्प करु शकत नसे.

सत्याचे वडीलभाऊ शेषम राजू ते लहान सत्याच्या कामांमुळे काळजीत पडले. एवढेच नव्हे तर सत्याला कोणीतरी पाताळातील बुद्धिमान आत्म्याने झपाटले आहे याबद्दल त्यांचा विश्वास दृढ झाला. त्यांनी सत्याला उरवकोंडाला नेले व आपल्या नजरेखाली ठेवले. परंतु सत्याने चमत्कार करणे, लोकांना बरे करण्याचे व उपदेश करण्याचे आपले काम चालूच ठेवले.

एके दिवशी ईश्वराम्मा सत्याला तेल लावून चोळीत असताना त्यांच्या लक्षात आले की सत्याचा डावा खांदा दुखावला असावा. जेव्हा त्यांनी विचारले की दूरच्या विहीरीवरुन पाणी आणल्याने असे दुखत आहे का तेव्हा सत्याने मान्य केले व सांगितले की त्याला सकाळ संध्याकाळ सहावेळा येऊन जाऊन भावाच्या कुटुंबासाठी पाणी भरावे लागते. याशिवाय आणखी दोन कुटुंबांनी विनंती केल्यावरून त्यांचेही पाणी त्याला भरावे लागते. माता ईश्वरम्माचे डोळे पाणावले. परंतु सत्या म्हणाला, “अम्मा, मी अत्यंत प्रेमाने जीवनासाठी पाणी आणत आहे. मी या सेवेसाठीच आलेलो आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *