स्वामींच्या जवळ वा दूर

Print Friendly, PDF & Email
स्वामींच्या जवळ वा दूर
नमुना क्रिया
  1. आपल्या हातांनी करता येणाऱ्या विविध कृती यादी करण्यास मुलांना सांगा.
  2. त्या क्रिया “चांगल्या” आणि “चांगल्या नाही” श्रेणीमध्ये वर्गीकृत करण्यास सांगा.
  3. यातील प्रत्येक क्रिया कागदाच्या लहान तुकड्यांवर लिहा आणि कागदाच्या तुकड्यांची घडी करा हे सर्व तुकडे एका पेटीत टाका आणि ते चांगले मिसळा.
  4. प्रत्येक मुलाला पेटीतून एक कागद उचलायला सांगा.
  5. मुलाने उचललेल्या कागदावर चांगली कृती असल्यास, मुलाला वर्गात स्वामींच्या वेदीपाशी (किंवा छायाचित्र) च्या पुढे उभे रहाण्यास सांगा.
  6. मुलाने एखादी— चिठ्ठी उचलल्यास मुलाला वेदी (अल्टार) किंवा छायाचित्रापासून दूर खोलीच्या दुसर्‍या टोकाला उभे राहण्यास सांगा.
“चांगली” क्रिया “चांगली नसलेली (वाईट)” क्रिया
लिखित जप भिंतीवर नखाने खरडणे
इतरांबरोबर आपली वस्तु वाटून घेणे इतरांना विचारल्याशिवाय त्यांच्या वस्तू घेणे
इतरांना प्रोत्साहित करण्यासाठी टाळ्या वाजवणे इतर खाली पडतात, तेव्हा टाळ्या वाजवून हसणे
इतरांना मदत करणे इतरांना मारणे, चिमटे काढणे
शाळेत/बालविकास वर्गात नोट्स लिहिणे परीक्षेत कॉपी करणे
आईला मदत करणे अन्न वाया घालवणे/ फेकून देणे
झाडांना पाणी देणे गरज नसतांना पाने, फुले तोडणे

शिकविलेले मूल्य

नेहमी चांगले करावे.

चांगले केल्याने आपण देवाजवळ जाऊ.

आपले हात नेहमी चांगल्या कामांसाठी वापरा आणि इतरांना मदत करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *