नूतन वर्ष समारंभ

Print Friendly, PDF & Email
नूतन वर्ष समारंभ

भगवान श्री सत्य साई बाबांप्रती भक्तिभाव समर्पित करण्यासाठी दररोज हजारो भक्त पुट्टपर्तीत येतात, त्यामुळे पुट्टपर्तीत प्रत्येक दिवस हा विशेष दिवस असतो. जेव्हा विविध धर्मांचे, संस्कृतीचे भक्त प्रचंड मोठ्या संख्येने, त्यांचे महत्त्वाचे दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी छोट्या गावातील प्रशांती निलयम सारख्या शांतीच्या निवासस्थानी उपस्थित असतात, असे काही दिवस तर अधिकच वैशिष्ट्यपूर्ण असतात. भारताच्या आणि जगाच्या सर्व भागातून भक्त तेथे गर्दी करतात. प्रशांती निलयममध्ये वर्षातील प्रत्येक महिना दुमदुमणारा असतो. पुट्टपर्तीतील उत्सवाच्या कॅलेंडरमध्ये, नवीन वर्ष समारंभाची समावेश आहे. केवळ प्रत्येक वर्षाचा १ जानेवारी हा दिवसच नव्हे तर चीनी, तेलगु. तमिळ, मल्याळम आणि गुजराती नवीन वर्ष समारंभही तेथे साजरा केला जातो.

भगवान बाबांच्या चरण कमलांपाशी भक्तगण जमा होतात व त्यांच्या चरणी प्रार्थना समर्पित करतात. भगवानांचे ह्या दिनानिमित्तचे संदेश म्हणजे पुढील परिवर्तनासाठी दिलेली जागृतीची आरोली. भक्तगण त्यांची संस्कृती दर्शवणारे कार्यक्रम आयोजित करतात. तेथे जमलेल्या प्रत्येकासाठी विविध संस्कृतीचा परिचय करून घेण्याची व त्यांच्या विषयी आदरभाव विकसित करण्याची संधी आहे.

जरी सर्व उत्सव अत्यंत उत्साहाने व आनंदाने साजरे केले जात असले तरी भगवानांनी म्हटले आहे,” वर्षातील एखादा विशेष दिवस निवडून, तो दिवस आनंदाने साजरा करणे म्हणजे मूर्खपणा आहे. खऱ्या भक्तासाठी, प्रत्येक दिवस हां ‘उत्सवाचा दिवस आहे. मग आपण कोणताही उत्सव वा नूतन वर्ष समारंभ साजरा करताना आपन कोणत्या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत?”

१३ एप्रिल २००२, युगादी (तेलगु नवीन वर्ष) च्या दिवशी स्वामींनी दिलेल्या प्रवचनात उत्सव कसा साजरा करावा हे त्यामध्ये सांगितले आहे. ते म्हणतात, “जर आपण आपल्या मनाचा संकुचितपणाचा व स्वार्थीपणाचा त्याग केला तर आपण खऱ्या अर्थाने युगादी साजरा केला असे म्हणता येईल. युगादीच्या दिवशी लोकं पहाटे उठतात, स्नान करतात, नवीन कपडे घालतात व मिष्टान्नाचा स्वाद घेतात. बाह्य स्वच्छता आणि नवीन कपडे घालणे, हे तसे सोपेच आहे. त्यांना केवळ बाह्य स्वच्छतेतच स्वारस्य असते. परंतु दुर्विचार व दुर्भावनांनी डागाळलेले ह्रदय शुद्ध करण्याचे त्यांच्या ध्यानी मनी नसते. परंतु तो काही उत्सव साजरा करण्यामागचा हेतु नाही. चित्त शुध्दी, निःस्वार्थ भाव विकसित करणे, दुष्प्रवृत्तींचा त्याग, ह्या मनुष्याला उदात्त बनवण्यांच्या गोष्टींचे आचरण करणे म्हणजे खऱ्या अर्थाने युगादी साजरा करणे होय. जेव्हा तुम्ही तुमच्यातील दुर्गुणांचा त्याग करून तुमचे ह्रदय प्रेमाने भरूँ टाकता व त्यागाचा मार्ग स्वीकारता ते खरे युगादी. आपण ह्या युगादीच्या दिवशी काय केले पाहिजे? आज ह्या शुभदिन आपण आपले अंतःकरण शुद्ध करण्याचे प्रयत्न सुरु केले पाहिजेत. ह्या मंगल दिवशी, तुम्ही तुमचे ह्रदय प्रेमाने भरून टाकले पाहिजे आणि मूर्तिमंत प्रेम बनून पवित्र उपक्रम हाती घेतले पाहिजेत.”

VISHU CELEBRATIONS

TAMIL NEW YEAR CELEBRATIONS

CHINESE NEW YEAR

                           

GUJARATI NEW YEAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *