पीटर

Print Friendly, PDF & Email
पीटर

पश्चिम युरोपच्या भागास आपण हॉलंड वा नेदरलँड म्हणतो. तो समुद्र सपाटीच्या खालच्या पातळीवर आहे. परंतु पाण्याच्या भिंती (ज्यांना ते डाईक्स म्हणतात) त्या भागाचे, दीर्घकाळापासून समुद्राच्या प्रवाहापासून संरक्षण करत आहेत.

खूप पूर्वी जेव्हा प्रथम ह्या डाईक्स बांधल्या गेल्या त्या आत्ताइतक्या मजबूत बांधल्या नव्हत्या. त्यामुळे अनेकदा झीज झाल्यामुळे डाईक्सला छोटी गळती लागल्याचे दिसून येई, आणि ते लगेच दुरुस्त केले नाही तर त्याला भगदाड पडण्याची आणि तसे झाल्यास समुद्र किनाऱ्यावरील रहिवाशांना समुद्र आपल्या पोटात सामावून घेण्याची भिती होती. म्हणून डाईकस्वर दिवसरात्र सतत जागता पहारा असे.

Peter Discovered the leak in the dyke

एक दिवस सूर्यास्तानंतर असे घडले, की पीटर नावाच्या एका गुराख्याला डाईक्सला गळती लागल्याचे दिसून आले. त्या कार्यावरील पहारेकरी नुकताच कामावरून परत गेला होता. आणि तो थोड्या अवधीत परतही येणार नव्हता. समोरील स्थिती पाहून त्याला येऊ घातलेल्या संकटाची कल्पना आली. एकीकडे तो मदतीसाठी मोठ्याने ओरडत होता व त्याचवेळी बोटानी ते छिद्र बुजवण्याचा प्रयत्न करत होता. ना तेथे कोणाचा आवाज होता, ना कोणी त्याच्या हाकाट्यांना प्रतिसाद देत होते. झोंबणारे थंड वारे वाहत होते. थंड पाणी त्याला गोठवून टाकत होते. त्याचा आवाज क्षीण झाला होता. त्याने जोराने त्याचा संपूर्ण हात त्याच्यात घुसवला. संवेदना नाहीशा झाल्यावर त्याने त्याचा दुसरा हातही जोराने घुसवला. जर तो गोठला नसता तर त्याने त्याचे पाय, संपूर्ण देह ती गळती रोखून धरण्यासाठी त्यामध्ये घुसवला असता! परंतु तो गोठला आणि त्याची शुद्ध हरपली. पहारेकरी कामावर परत आल्यानंतर अशा अवस्थेत त्याला तो तेथे आढळला.

प्रश्न
  1. शूर पीटरची कहाणी तुमच्या शब्दात लिहा.
  2. तुम्हाला अशी दुसरी एखादी गोष्ट माहित आहे का?

[स्त्रोत- Stories for children-II
प्रकाशक- SSSBPT Prashanti Nilayam]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *