वनस्पतींनासुद्धा भावना असतात

Print Friendly, PDF & Email
वनस्पतींनासुद्धा भावना असतात

डॉ. जगदीशचंद्र बोस हे मोठे जीव शास्त्रज्ञ होते. वनस्पतींन भावना असतात हे त्यांनी दाखवून दिले. भगवान चंद्र बोस व अबाला यांचे ते सुपुत्र होते. दोघांनीही जगदीशचंद्रांना शास्त्रीय संशोधनासाठी प्रोत्साहन दिले. भगवान बोस हे व्यवसायाने न्यायाधीश होते पण ते शास्त्र व संशोधनप्रेमी होते. मुलांना जिथे बंगाली माध्यमातून शिकवले जात असे अशा शाळेत जगदीशचंद्राना पाठविण्यात आले. त्यांना गरीब मुलांमध्ये मोकळेपणाने मिसळू देण्यात आले व खेळू देण्यात आले. लहानपणीच लहानपणीच त्यांना खूप कुतूहल होते आणि त्यांना अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या असत. काजवा म्हणजे का? वारा व पाणी वाहतात ते का? त्यांनी एका तलावात बेडूक व मासे वाढविले होते. एखादे अंकुरणारे रोप उपटून त्याच्या मुळांचे निरीक्षण ते करीत असत. त्यांच्यापाशी अनेक पाळीव प्राणी, उंदीर, खारी व बिनविषारी साप होते.

त्यांचा एक नोकर होता. तो त्यांना शौर्ययुक्त साहसाच्या कथा सांगत असे. अबला त्यांना रामायण व महाभारतातील गोष्टी सांगत असत. आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीविषयी त्यांना प्रेम व आदर होता. त्यांचे काही शिक्षण इंग्लडमध्ये झाले. त्यानंतर ते परत आले व कलकत्त्यातील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये रूजू झाले. ते खूप परीक्षण करीत असत व पैसे शिल्लक टाकीत असत. त्यांना त्यांच्या स्वतःच्या संशोधनासाठी एक प्रयोगशाळा बांधायची होती.

विद्युत् हा त्यांचा खास विषय होता. त्यांनी प्रयोग करून असे दिले की एखाद्या रोपामधून विद्युत्प्रवाह सोडला की ते उत्तेजित होते किंवा त्रस्त होते. रोपाची विद्युत्प्रवाहाला होणारी प्रतिक्रिया दाखवणारे एक त्यांनी तयार केले होते.

Dr. J.C.Bose, proved Plants too can feel

दाखवून जगदीशचंद्रांना त्यांच्या सिद्धांतांचे स्पष्टीकरण करण्यासाठी रॉयल सोसायटीने पाचारण केले. त्यांनी हे दाखवून दिले की, एखाद्या वनस्पतीला विष टोचले तर तिलासुद्धा त्रास होतो व ती मरते. काही वनस्पती सरळ वाढतात व काही तशा वाढत नाहीत ते का हेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष उपकरणाच्या साहाय्याने वनस्पतीची स्पर्शाला होणारी प्रतिक्रिया त्यांनी दाखवून दिली, त्या काळात भारतीय शास्त्रज्ञ एखाद्या नाजूक उपकरणाचा आराखडा करू शकतो व शोध लावू शकतो अशी कल्पनासुद्धा कोणी करू शकत नव्हते. बोसांनी हेही स्पष्ट केले की वनस्पतींना प्रकाशाची खूप आवड असते आणि म्हणून तापमान जसे जास्ती कमी होईल तशा त्या विकसित होतात व मिटतात.

मुळे नसली तरी वनस्पती पाणी घेऊ शकतात हेही बोसांनी प्रामाणाने सिद्ध केले. त्यांनी असे सांगितले की वनस्पतीतील पेशी मानवी हृदयाप्रामणे आकुंचन व प्रसरण पावत असतात. पाश्चात्यांनी प्रश्न विचारले असता बोस म्हणत असत: “भारतातील ऋषींना हे सर्व फार पूर्वीच माहीत होते. जीवनातील एकतेवर त्यांचा विश्वास नव्हता काय?” पुन्हा पुन्हा वापरल्याने पातेसुद्धा थकून जाते हेही त्यांनी दाखवून दिले.

जगदीशचंद्र बोस यांच्यावर टागोर व विवेकानंद यांचे फार प्रेम होते. व त्या दोघांचाही सल्ला त्यांना मिळत असे. मृत्यूपूर्वी त्यांनी आपली एकमेव आकांक्षा पूर्ण केली. त्यांनी एक संशोधनसंस्था उभारली आणि अनेक तरुण मुलांना शास्त्रीय संशोधन करण्याची स्फूर्ती दिली. त्यांनी परदेशात व्याख्याने दिली. अनेक निबंध लिहिले व कित्येक उपरकणे तयार केली.

प्रश्न
  1. जे सी बोस यांच्या वडिलांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे ती लिहा.
  2. कोणत्या विषयामध्ये त्यांना विशेष रस होता?
  3. वनस्पतींच्या संबंधात त्यांना काय विश्वास वाटत असे आणि त्या संबंधात त्यांनी काय सिद्ध करून दाखविले या बद्दल लिहा.

[Source – Stories for Children – II
Published by – Sri Sathya Sai Books & Publications Trust, Prashanti Nilayam]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: