विज्ञान आणि मानवता

Print Friendly, PDF & Email
विज्ञान आणि मानवता

सर हम्फ्री डेव्ही ह्यांनी ‘डेव्हीज सेफ्टी लॕम्प’ चा शोध लावला. त्यांनी ह्या दिव्याचा शोध लावण्या आगोदर, कोळशाच्या खाणीत कामकरणाऱ्यांना आगीच्या अपघाताचा संभाव्य धोका असे. कारण खाणींमध्ये अनेक प्रकारचे वायू असतात जे साधारण दिव्याच्या संपर्कात आले तर सहज पेट घेऊ शकतात.

Davy's Invention

सर हम्फ्री ह्यांनी, खाणीमधील वायू दिव्याच्या संपर्कात येऊनही पेट घेणार नाहीत अशा प्रकारच्या दिव्याचे डिझाईन बनवण्यासाठी अनेक वर्ष अपार मेहनत घेतली. खरोखरच हा एक महान शोध खाणकामगारांसाठी एक वरदान ठरला आहे!

ह्या शोधाचे पेटंट घेऊन हम्फ्री पैसे कमवू शकले असते, परंतु हम्फ्रिंनी तसे करण्याचे नाकारले. त्यांनी ते पेटंट जनतेला मोफत दिले.

एकदा एक मित्र त्यांना म्हणाला, “ह्या पेटंटने तू तुझे भाग्य उजळून टाकू शकतोस, विचार कर”. डेव्ही त्याला म्हणाले, “नाही मित्रा, अशा गोष्टींचा मी कधीही विचार केला नाही. मानवतेची सेवा हीच माझी एकमात्र इच्छा आहे. मला हे चांगले माहीत आहे, की अधिक धन मनुष्याला अधिक नावलौकिक प्राप्त करुन देत नाही वा त्याला अधिक आनंद प्रदान करत नाही. माझ्याकडे जे आहे त्यामध्ये मी समाधानी आहे”.

सर हम्फ्री एक महान शास्त्रज्ञ व मानवतावादी म्हणून अजरामर झाले.

प्रश्न
  1. हंफ्री यांनी कशाचा शोध लावला?
  2. याला एक वरदान म्हणून का मानले गेले?
  3. त्यांच्या मित्रानी कोणता सल्ला दिला?
  4. डेव्हीने काय उत्तर दिले?

[स्त्रोत- Stories for children-II
प्रकाशक – SSSBPT Prashanti Nilayam]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: