दसऱ्याचे महत्त्व

Print Friendly, PDF & Email
दसऱ्याचे महत्त्व

नवरात्री-उत्सव हा एक आभार मानण्याचा व कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव आहे.

अ) देवी सरस्वतीने ज्ञानाची देणगी दिली, ब) देवी लक्ष्मीने मूलभूत गरजा पूर्ण करण्याची देणगी दिली. क) काम, क्रोध, लोभ, मोह मद आणि मत्सर्य या आंतरिक दुष्ट शक्तींपासून आणि बाह्यदुष्ट शक्तींपासून देवाने आपले संरक्षण केले यासाठी त्यांना धन्यवाद द्यावयाचे आहेत.

नवरात्री उत्सव हा असा चांगल्या शक्तींनी वाईट शक्तींवर मिळविलेल्या विजयासाठी साजर केला जातो

नवरात्री उत्सव हा लोकप्रिय उत्सवांमधील एक उत्सव सर्व भारतभर वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो.

भारताच्या बऱ्याच भाग़ात तो दुर्गापूजा उत्सव म्हणून ओळखला जातो मानवाचे विनाशापासून रक्षण करण्यासाठी महिषासुर नावाच्या राक्षसाचा नाश करणाऱ्या रणचंडीच्या रुपातील दुर्गादेवीची या दिवसात आराधना केली जाते.

नवरात्री उत्सव हा सर्व लोकप्रिय उत्सव असून तो अश्विन महिन्याच्या शुध्द प्रतिपदेस सुरु होतो. इतक्या दीर्घकाळ (नऊ दिवस) पर्यंत चालणारा असा हा हिंदूंमधील बहुधा एकमेव उत्सव आहे. त्याला नवरात्री म्हणतात कारण तो नऊ दिवस आणि नऊ रात्री साजरा केला जाता. हां उत्सव नऊ दिवस साजरा करण्याचे विशेष महत्त्व आहे प्रथम तीन दिवस कालीची उपासना केली जाते. नंतरचे तीन दिवस लक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस सरस्वतीची उपासना केली जाते.

देवी कालीमाता ही वाईट गोष्टींचा नाश करणारी आहे. म्हणून मानवा मधील दुर्गुणांचा नाश करण्यासाठी कालीमातेची उपासना करावयाची असते. लक्ष्मी गुणसंपत्तीची वाढ करते. गुणसंपत्ती म्हणजे चांगले व विधायक विचार जे आपल्या अंतःकरणातील दुर्गुणांना काबूत आणल्यावरच वाढू शकतात. मानवातील सद्गुणरुपी संपत्तीची समृध्दी करण्यासाठी लक्ष्मीची उपासना करतात. जेव्हा आपल्यातील दुर्गुण नष्ट होतात व सदगुणांची वाढ होते तेव्हा ज्ञानाचे आकलन व प्राप्ती शक्य होते. सरस्वती ही ज्ञानाची देवता आहे. हे दान माणसाची बुध्दी शुद्ध करते आणि माणसाला आत्मज्ञानाच्या मार्गावर नेते. यासाठीच नवरात्रातील शेवटचा दिवस, खालच्या पातळीवरुन वरच्या पातळीवर जीवनाचा साक्षात्कार करून घेण्यासाठी सरस्वती देवीची पूजा करावयाची असते.

साक्षात प्रभूरामचंद्रांनी सुध्दा दैत्य रावणाचा संहार करण्यासठी आवश्यक अशा शक्ती प्राप्त करून घेण्यासाठी शाक्तित्वाचे साकार स्वरूप असलेल्या दुर्गादेवीची नऊ रात्री आराधना केली होती

नवरात्री उत्सव चालू असतांना तीन ते दहा वयोगटातील कुमारिकांना भोजन,नवी वस्त्रे देऊन त्यांचीही पूजा केली जाते, असाही उल्लेख सापडतो.

भारताच्या उत्तरेकडे, रामायणातील विविध प्रसंगावर आधारित रामलीलांचे प्रयोजन करीत दसरा साजरा केला जातो. यात राम-रावण युध्दाचा प्रसंग आवर्जून दाखदिला जातोच. राक्षसांवरील विजय दहाव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवसालाच विजयादशमी (दसरा) म्हणतात, या दिवशी रावणाच्या प्रतिमा उभ्या करून नंतर त्या जाळल्या जातात.

भारताच्या दक्षिणेकडे या दहा दिवसात बाहुल्यांचे प्रदर्शन भरले जाते आणि प्रदर्शनात भाग घेण्यासाठी आसपासच्या गावातील स्त्रियांना निमंत्रण दिले जाते.

शेवटचा दिवस हा आयुधपूजेचाही दिवस असतो. या दिवशी ज्या हत्यारांच्या व उपकरणाच्या साहाय्याने कामगार आपला उदरनिर्वाह चालवतात त्यांची ते पूजा करतात. सुतार, गवंडी, आदीची अशी श्रद्धा असते की आयुधपूजेच्या वेळी देवीला आवहन करून आशीर्वाद मागितले तर ती कामातील अधिक कौशल्याप्राप्तीचे व भाग्यप्राप्तीचे वरदान देते.

प्रशांतिमंदिरातील दसरा

भगवान बाबांनी १९६१ पासून नवरात्री उत्सव व दसरा उत्सवातील एक भाग म्हणून – वेदपुरुष -ज्ञानसप्ताहाची प्रथा सुरु केली आहे . त्याचा एकमेव उद्देश्य म्हणजे धर्म प्रकाशित करणे, व्यक्तिशुध्दी आणि मानव जातीचे कल्याण साध्य करणे हा आहे. या यज्ञाची सांगता म्हणजे पूर्णाहुती विजय दशमीच्या दिवशी होते.

याच काळात भगवान आपल्या विद्यार्थ्यांना ग्राम सेवेसाठी पुट्टपार्थीच्या आसपासच्या खेड्यांमध्ये पाठवतात आणि ते घरोघरी जाऊन लोकांना अन्न आणि कपड्यांचा पवित्र प्रसाद देऊन त्यांची सेवा करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *