श्री सत्य साई सुप्रभातम (कडवे ९)
श्री सत्य साई सुप्रभातम (कडवे ९)
ऑडिओ
श्लोकाचे बोल
- सुप्रभातमिदं पुण्यं
- ये पठन्ति दिने दिने ।
- ते विशन्ति परंधाम
- ज्ञान विज्ञान शोभिताः ।।
अर्थ
जो कोणी या सुप्रभातम (जागृत स्तोत्र) नित्य पठण (श्रद्धा व भक्ती पूर्ण) करील तो सर्वोच्च स्थान (ध्येय) प्राप्त करील. उच्च तेजस्वी ज्ञानाने तो युक्त होईल आणि सर्वोच्च शहाणपणा त्याला प्राप्त होईल.
स्पष्टीकरण
सुप्रभातम | सुप्रभात गीत |
---|---|
इदं | हे |
पुण्यम | पवित्र |
ये | जे लोक |
पठन्ति | म्हणतात |
दिने दिने | प्रत्येक दिवशी |
ते | ते |
विशन्ति | प्रवेश करतात |
परम | अंतिम |
धाम | स्थान |
ज्ञान | ज्ञान |
विज्ञान | सूज्ञता |
शोभिताः | तेजाने चमकणारे |
श्री सत्य साई सुप्रभातम (सुप्रभातमिदं…)
स्पष्टीकरण :
जो कोणी या दिव्या स्तोत्राचे नित्य पठण करील तो सर्वोच्च् स्थान प्राप्त करील. उच्च् तेजस्वी ज्ञानाने तो मुक्त होईल, तसेच सर्वोच्च् शहाणपण त्याला प्राप्त होईल.
आमचे सद्गुरू साई आमच्या आत्मिक जाणिवेला नित्य जागृत करोत.