मोर
मोर
मुलांनो ! एक उडी मारा आणि वळा! हात वर! हात खाली!
या सुंदर मोराकडे पहा … हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. आता खाली बसा. पाठ ताठ, हात चिन्मुद्रेमध्ये आणि डोळे बंद! फक्त बोलण्याकडे लक्ष द्या.
आपण अशा एका बागेमध्ये जात आहोत जिथे खूप मोर आहेत. हे मोर दाणे टिपत आहेत बरं का! आकाशाकडे बघा किती ढग आले आहेत. प्रत्येक मोर आपला पिसारा फुलवून आनंदाने नृत्य करत आहे. वा! चमकणाऱ्या रंगांचा किती सुंदर फुलोरा! नीळा, जांभळा … असे अनेक सुंदर रंग! त्याचं ते मानेला हेलकावे देणं आणि त्याचं नृत्य अगदी डौलदार आहे. किती सुंदर दृश्य आहे हे!
आपल्या पिसांमधून तो आपले सौंदर्य पसरवितो. आपण सौन्दर्य कसे बरं पसरवितो? आपण प्रत्येक जण या सुंदर मोरासारखे आहोत. दया, प्रामाणिकपणा, स्वच्छता, शिस्त, चांगली वागणूक हे सद्गुण म्हणजे आपली पिसे आणि यातून आपण आपल्या जीवनातील सुंदरता पसरवू शकतो. आपण निसर्गाकडून अनेक गोष्टी शिकतो. आपण निसर्गाची काळजी घेतली पाहिजे.
आता म्हणा,
‘हे परमेश्वरा! मला चांगले पाहण्यास, चांगले करण्यास आणि चांगले होण्यास मदत कर’ आता हळूहळू डोळे उघडा.
उपक्रम:
बागेमध्ये तुम्ही जे पहिले त्याचे चित्र काढा.
[उगम:- चित्रा नारायण आणि गायत्री रामाचरण संबू यांच्या- Silence to Sai-lens:(सायलेन्स टु साईलेन्स) या मुले, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी असलेल्या हॅन्डबुकमधून- श्री सत्यसाई शिक्षण संस्था:-मॉरिशस पब्लिकेशन]