खजिन्याचा शोध (ट्रेझर हंट)

Print Friendly, PDF & Email
खजिन्याचा शोध (ट्रेझर हंट)
उद्देश्य :-

मुलांनी सदैव चांगल्या मानवी मूल्यांच्या शोधात असावे आणि ही मूल्ये स्वतःमध्ये रुजविण्यास सदैव उत्सुक असावे.

संबंधित मूल्ये:-
  • उत्सुकता
  • दृढ निश्चय
  • जागरूकता
साहित्य:-

सकारात्मक मूल्ये (उदा.-प्रेम, सेवा इ.) लिहिलेल्या चिठ्ठया .

खेळ कसा खेळावा:-
  1. एका चिठ्ठीवर सकारात्मक मूल्य लिहावे व गुरूने ती चिठ्ठी खोलीमध्ये कुठेतरी लपवून ठेवावी.
  2. एका मुलाला ही चिठ्ठी शोधण्यास सांगावे
  3. ते मूल त्या मूल्याच्या (म्हणजे त्या चिठ्ठीच्या) जवळ किंवा आसपास पोहोचल्यास बाकीच्या मुलांनी- ‘हिरवा’ असे ओरडावे.
  4. ते मूल त्या विशिष्ट जागेपासून दूर जाऊ लागल्यास बाकीच्या मुलांनी- ‘लाल’ असे ओरडावे.
  5. त्या मुलास जर ते मूल्य ( म्हणजे ती चिठ्ठी) शोधता आली नाही तर दुसऱ्या मुलास संधी द्यावी.
  6. आणि जर ती चिठ्ठी सापडली तर गुरूंनी ती चिठ्ठी मुलांच्या नकळत दुसऱ्या ठिकाणी लपवावी.
  7. अशा प्रकारे खेळ चालू ठेवावा आणि विजेत्यांना गुण द्यावेत!!