भारताचा तिरंगी ध्वज
भारताचा तिरंगी ध्वज
उद्देश: प्रथम गटाच्या विद्यार्थ्यांना समजावून सांगणे की, आपण सर्वजण एकमेकांवर अवलंबून आहोत; एकमेकांच्या गरजा जाणून व एकमेकांना मदत करण्यासाठी गटाने काम केल्यास आपली प्रगती होईल.
साधनसामग्री: मोठा कागद, कात्री, रंगीत पेन्सिली, साधी पेन्सिल, रबर, डिंक इ.
कृती:
- मुलांचे दोन गट करावेत.
- वरील साहित्य दोन गटात विभागून घ्यावे, गटात जास्त मुले असल्यास गुरुंनी जास्त गट करावेत. एकाच गटाला सर्व साहित्य मिळणार नाही याची खात्री करून घ्यावे. उदा. मुलांच्या गटाला भगव्या रंगाची पेन्सिल, कागद, कात्री आणि पेन्सिल द्यावी तर मुलींच्या गटाला हिरव्या रंगाची पेन्सिल, पेन्सिल, कागद व डिंक द्यावा.
- दोन्ही गटांना सांगावे की भारताचा झेंडा काढून, रंगवून तो काठीला लावायचा आहे.
- प्रथम मुले तक्रार करतील की त्यांच्याकडे आवश्यक साहित्य नाही. उदा. मुलांच्या गटाकडे हिरवा मुलींच्या गटाकडे भगवा रंग नाही डिंक नाही इ. मग मुलांनी एकमेकांकडील साहित्य घ्यावे. गुरुंनी दोन्ही गट कसे वागत आहेत याचे निरिक्षण करावे. सर्व मुले प्रकल्पात भाग घेत आहेत ना हेही पहावे.
- मुलांना तिरंगा ध्वज घेण्यास सांगावे व राष्ट्रगीत म्हणायला सांगावे.
चर्चेसाठी प्रश्न
- एकमेकांना वस्तू देतांना मुलांना आनंद होतो का?
- दुसऱ्या गटाकडून वस्तू न घेता प्रकल्प पूर्ण झाला असता का?
- गटाने काम करताना कसे वाटले? दुसऱ्याचे होईपर्यंत व वस्तु मिळेपर्यंत मुले शांतपणे थांबली होती का?
- कृती पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या गटासाठी मुले थांबली होती का?
- मुले दुसऱ्या गटाकडून वस्तु नम्रतेने मागत होती का?
तात्पर्य/ निष्कर्ष
एकजुटीने काम करण्याचे आणि एकमेकांना मदत करण्याचे महत्त्व जीवनात यशस्वी होण्यासाठी आहे हे गुरुंनी सांगावे.
या प्रकल्पात थोडासा बदल असा करता येईल –
वस्तूंपैकी एक आवश्यक वस्तू गुरुंनी स्वतःकडे उदा. डिंकाची ट्यूब. मुलांनी रंगकाम संपवले की काठीला झेंडा चिकटवण्यासाठी गुरुंनी मदत करावी व त्यानंतर प्रश्न विचारावेत
- प्रकल्प संपदानासाठी डिंक महत्त्वाचा होता का?
- केवळ डिंकाच्या सहाय्याने गुरुंना झेंडा बनवता आल असता का?
स्वामी नेहमी सांगतात त्यानुसार, “इन्द्रिये आणि भावना ह्यांना प्रशिक्षण देण्याच्या प्रक्रियेत गुरु आणि शिष्य यांची एकमेकांना मदत असते.” वरील प्रकल्पाच्या सहाय्याने गुरुंनी सांगावे की योग्य ज्ञानासाठी गुरु आणि मुले (विद्यार्थी) यांनी एकत्र काम केले पाहिजे.