त्रिगुण
त्रिगुण
उद्दिष्ट:
मुलांना खेळताना, मौज वाटेल असा हा खेळ आहे. हा खेळ खेळताना मुलांनी सत्व, रजो, आणि तमोगुणांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तीन गोष्टींचे मिश्रण वेगवेगळे करून सात्विक गुणांचा सराव करायचा आहे.
संबंधित मूल्ये:
- एकाग्रता
- विवेक बुद्धी
- सांघिक-बांधिलकी
साहित्य:
तीन वेगवेगळी कडधान्ये
- काबुली चना- सात्विक
- काळा चना- तामसिक
- राजमा- रजो
- कडधान्य ठेवण्यासाठी छोट्या ताटल्या किंवा वाट्या
खेळ कसा खेळावा
- गुरुंनी वर्गातील मुलांचे छोटे गट बनवावेत.
- प्रत्येक गटाला तिन्ही कडधान्याचे मिश्रण द्यावे.
- प्रत्येक गटातील सर्व मुलांनी एकत्र येऊन, त्रिगुणांचे प्रतिनिधित्व करणारी तीन कडधान्ये लवकरात लवकर वेगवेगळी करावीत.
- जो गट हे काम प्रथम करेल तो विजयी होईल.
गुरूंसाठी सूचना:
- खालील गोष्टींवर अधिक प्रकाश टाकण्यासाठी हा खेळ खेळून झाल्यानंतर वर्गातील मुलांबरोबर केलेली चर्चा खूप प्रभावी ठरेल-
- तीन गुणांची उदाहरणे रावण- रजो गुण, बिभीषण- सात्विक गुण, कुंभकर्ण- तमो गुण
- सत्य भक्ती इ. सारखे सात्विकतेचे विशेष गुण मुलांच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे.
- प्रत्येक गटाने दिलेले काम त्यांच्यामध्ये कसे विभागले आणि त्याचा कसा फायदा झाला हे पाहणेही आवश्यक आहे.