श्री सत्य साई सुप्रभातम कडवे २
श्री सत्य साई सुप्रभातम कडवे २
ऑडिओ
श्लोकाचे बोल
- उत्तिष्ठोत्तिष्ठ पर्तीश
- उत्तिष्ठ जगतीपते
- उत्तिष्ठ करुणापूर्णा
- लोकमंगल सिद्धये
अर्थ
जागे व्हा, जागे व्हा, पर्तीच्या देवा,सर्व जगाच्या परमेश्वरा जागा हो,हे कल्याणपूर्ण प्रभू,मानवतेच्या कल्याणासाठी जागा हो.
स्पष्टीकरण
उत्तिष्ठोत्तिष्ठ | जागे व्हा, उठा |
---|---|
पर्तीश | पुट्टपर्ती चा प्रभू |
जगती | जगाच्या |
पते | परमेश्वरा |
करुणापूर्णा | करुणेने पूर्ण |
लोक | जगाच्या |
मंगल | कल्याणासाठी |
सिद्धये | पूर्ण करणे |
श्री सत्य साई सुप्रभातम (उत्तिष्ठोत्तिष्ठ —)
गर्भितार्थ :
उत्तिष्ठ +उत्तिष्ठ, उठा जागे व्हा. हे आत्मतत्त्वा,जशी नागानी वेढलेली पुट्टपर्तीची ओसाड जमीन आपण समृद्ध, शांत, सुंदर विकसित अशा प्रशांती निलयम मध्ये परिवर्तित केलीत, तसेच आपण माझ्या सम्पूर्ण अस्तित्वाची जबाबदारी घ्यावी आणि मला मोह लोभ, मद, मत्सर, काम आणि क्रोधाच्या विळख्यातून मुक्त करावे. माझे जीवन आपल्या कृपाप्रसादाने भरून जावू दे. त्या मुळे मी सगळ्यांसाठी पवित्र, मंगल होऊन जाईन (लोक मंगल सिद्धये).
जागतिपते -ज-जन्म -गती -मृत्युपती -ईश्वर.
जो जन्म मृत्युच्या पलीकडे नेतो, आपला अंतरात्मा.
स्पष्टीकरण :
जेव्हा सद्गुरु आपल्याला जागृत करतात तेव्हा अज्ञानाची रात्र संपते आणि मंगलमय पहाट होते. ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे जागृत करतात. उदा दर्शन, स्पर्शन आणि संभाषण. ते आपल्याला विविध गतींनी पुढे नेतात. आपण त्यांच्या कृपेमुळे आपल्या दिव्य आत्मतत्त्वाला जागृत करण्यासाठी साधना सुरु करतो.
सुप्रभातम म्हणताना आपण या गूढार्थाचे रोज चिंतन केले तर नक्कीच आपल्या दैवी ध्येयाप्रत ते चिंतन आपल्याला घेऊन जाईल (साई-आत्मा).
सुप्रभातम मधील ‘जागृत’ या शब्दाला आतंरिक, सूक्ष्म आणि खूप खोल अर्थ आहे. जसे गोष्टीतील गुरुसेनाने राजा धिरज ला त्याच्या राज्यातील वैभव दाखवले, तसे गुरु आपल्याला जागृत करून आपण ईश्वराचे पुत्र आहोत हे सत्य दाखवतात. ख्रिस्ताने म्हटले आहे, ‘ईश्वराचे राज्य तुझ्यामध्येच आहे.’
सगळ्या प्रकारच्या शक्ती, सद्गुण खरेच आपल्यात असून अज्ञानाचा पडदा आपल्याला दूर करायचा आहे. आपले गुरु प्रेमाने, दयेने मार्गदर्शन करून आपल्याला पुढे नेतात. ते म्हणतात, ‘मी ईश्वर आहे तसेच तू पण ईश्वर आहेस’, हे जाणून घ्या, ‘तुम्ही एक पाऊल पुढे आलात की मी तुमच्याकडे शंभर पावले येतो.’
आपल्यातील सहा शत्रूंशी आपल्याला लढा द्यायचा आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. आपण जेवढे जागृत आणि सतर्क राहू तेवढे आपले विचार शुध्द होतील. सात्विक विचारांनी आपण अंतर्मनात प्रवेश करू शकू, आपल्या साधनेची पातळी वाढेल.
अंतरंगातील ईश्वर जागृत झाला की, आपण त्याचे कार्य करण्याचे साधन बनायला तयार होऊ. आपण विविध सेवाकार्यासाठी तत्पर होऊ या आणि समाज कल्याणासाठी झटूया. आपल्याला एकच ईश्वर सर्व देवतांमध्ये जाणवेल. तसेच आपल्याला गरीब, गरजू, आजारी, दुःखी प्राण्यांमध्ये, सजीवांमध्ये ईश्वर दिसेल.