पुढे काय?
पुढे काय?
उद्दिष्ट:
हा उपक्रम मुलांची श्रवण क्षमता वाढवतो. ज्यामध्ये मुलांनी जे ऐकले असते ते लक्षात ठेवून नंतर पुन्हा आठवले पाहिजे. ह्या उपक्रमातून मुलांचे श्रवण कौशल्य वाढते.
संबंधित मूल्ये
- एकाग्रता
- स्मरणशक्ती
खेळ कसा खेळावा
- गुरुंनी वर्गातील मुलांना दोन गटात विभागावे.
- त्यानंतर एकमेकांशी संबंधित नसलेले १० शब्द गुरूंनी मोठ्यांनी म्हणावेत. कोणतेही शब्दाची पुनरावृत्ती करू नये.(उदा. मेणबत्ती, कमळ, पोपट, हनुमान, गंगा, कुराण इत्यादी.)
- गुरूंनी ते शब्द मुलांना अत्यंत लक्षपूर्वक ऐकण्यास सांगावे, तसेच ते शब्द पुन्हा आठवून सांगण्यास सांगावे.
- गुरुनी प्रत्येक गटाला एक कागद व एक पेन्सिल द्यावी.
- त्यांचे शब्द उच्चारून पूर्ण झाल्यावर मुलांनी त्या १० शब्दाची कागदावर यादी बनवावी.
- ज्या गटाने ते १० शब्द अचूक लिहिले असतील त्या गटाला गुण द्यावे.