शब्दांचा तक्ता
शब्दांचा तक्ता
उद्दिष्ट:
निवडलेल्या संकल्पनेशी संबंधित बनवलेल्या शब्दांचा नियोजित तक्ता, जो विद्यार्थ्यांना काही काळ दाखवला जातो. त्या तक्त्यामध्ये, संकल्पनेवर आधारित 25 शब्दांचा संच असतो आणि तो तक्ता एका ५ × ५ च्या लोखंडी चौकटीमध्ये बसवलेला असतो. (पान-२)
संबंधित मूल्ये:
- निरीक्षण
- एकाग्रता
- स्मरणशक्ती
गुरुंनी करावयाची तयारी:
- बालविकास अभ्यासक्रमाशी संबंधित असणारी एक संकल्पना गुरूंनी निवडावी (उदा.धर्म)
- एका चार्ट पेपरवर ३ वा ४ धर्मांशी संबंधित महत्त्वाच्या २५ संकल्पना लिहाव्यात आणि तो चार्ट पेपर ५ × ५ च्या लोखंडी चौकटीमध्ये बसवावा.
खेळ खेळण्याची पद्धत:
- वर्गातील मुलांचे गुरूंनी छोटे गट बनवावेत.
- गुरुंनी वर्गातील मुलांना एक किंवा दोन मिनिटे तो तक्ता दाखवावा आणि त्यांना त्यातील शब्द, त्यांची रचना, क्रम, प्रदर्शन, स्थान इ. लक्षात ठेवण्यास सांगावे.
- त्यानंतर तो तक्ता बाजूला करून मुलांना १० प्रश्नांचा संच द्यावा.
- जो गट जास्तीत जास्त प्रश्नांची बरोबर उत्तरे देईल त्याला सर्वात जास्त गुण मिळतील. (पान-३)
प्रश्नावली -:
- वरील तक्त्यामध्ये निर्देशित केलेले फुलाचे नाव सांगा.
- या तक्त्यामधे झोराष्ट्र?
- नावाचा उल्लेख आहे का?
- एका ओळीतील पाच शब्दांची क्रमाने नावे सांगा.
- तक्त्यामधील दोन स्त्रियांची नावे सांगा.
- यामध्ये कोणत्या दोन मानवी मूल्यांचा उल्लेख केला आहे?
- तक्त्यामधील दोन उत्सवांची नावे सांगा, ज्यांचा शेवटचा शब्द सारखा आहे.
- ईद या शब्दाच्या खाली असणारा शब्द —–
- दोन ऋषींची नावे सांगा.
- या तक्त्यामधील किती शब्द ख्रिश्चन धर्माशी संबंधित आहेत?
गुरूंसाठी सूचना
विविध प्रकार:
इतर संकल्पना- रामायण, उत्सव, एज्युकेअर इ.
ऑनलाइनसाठी सोयीचे
मुलांच्या समजून घेण्याच्या शक्तीचे मूल्यांकन करण्यासाठी शब्द तक्त्याच्या ह्या मनोरंजक खेळाची कोणत्याही विषयाशी सांगड घालता येईल.