शब्द स्ट्रिंग
शब्द स्ट्रिंग
उद्दिष्ट:
मुलांची एकाग्रता वाढवून, त्यांना संकल्पनेशी संबंधित शब्दांची दीर्घ मालिका लक्षात ठेवण्यास सक्षम बनवणे हे ह्या खेळाचे उद्दिष्ट आहे.
संबंधित मूल्ये-
- लक्ष केंद्रित करणे
- स्मरणशक्ती
- आत्मविश्वास
खेळ कसा खेळावा:
- गुरुंनी मुलांना गोलाकारात बसवावे.
- गुरुंनी वर्गामध्ये खेळाची संकल्पना घोषित करावी. (उदा. -भगवान शिव)
- गुरुंनि मुलांना खेळाविषयी समजावून सांगावे.
- पहिल्या मुलाने भगवान शिवाशी संबंधित एक शब्द सांगावा. (उदा.- शंकर)
- दुसऱ्या मुलाने ‘शंकर’ हा शब्द म्हणून त्यामध्ये अजून एक शब्द जोड़ावा. (उदा. शंकर + कैलास)
- तिसऱ्या मुलाने पहिले दोन शब्द उच्चारून त्यांत भगवान शिवाशी संबंधित अजून एक शब्द जोडावा (उदा. शंकर+कैलास+पार्वती)
- एखाद्या मुलास आधीचे शब्द न आठवल्यास वा त्याचा स्वतःचा शब्द पुढे न जोडता आल्यास खेळ थांबवावा.