भारतीय मोर- (पेव्हो क्रिस्टेटस) हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. तो रंगीबेरंगी, हंसाच्या आकाराचा पक्षी असून, त्याच्या माथ्यावर पिसांचा तुरा असतो. डोळ्यांखाली पांढरा टिपका असून, लांब बारीक मान असते.
या जातीतील नर मादीपेक्षा जास्त रंगीबेरंगी असून, त्याची छाती व मान चकचकीत निळ्या रंगाची’असते. कांस्य, हिरव्या रंगातील अतिशय नेत्रदीपक अशा सुमारे दोनशे पिसांनी बनलेला त्याचा मोठा पिसारा असतो.
मोराची मादी तपकिरी रंगाची असून ती नरापेक्षा आकाराने लहान असते व तिला शेपूट नसते.
माणसांतील कांही अतिशय स्तुत्य गुण मोरामध्ये सुद्धा आढळतात. आणि तो अखंडता आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. आपणही प्रयत्न केल्यास आपली सुप्त गुणवैशिष्ट्ये प्रकट करू शकतो.
हिंदू धर्मात मोराला मेघनाद, पाऊस आणि युध्द यांच्या देवाचे इंद्राचे प्रतीक म्हणून चित्रित करण्यात आलं आहे. दक्षिणेत मोराला भगवान मुरुगांचे, कार्तिकेयांचे वाहन मानले आहे.