राम या पवित्र नामा मधील ‘र’ हे अक्षर अग्नीचे द्योतक आहे, ‘आ’चा अर्थ सूर्य आणि ‘म’ हे अक्षर चंद्राचे प्रतीक आहे म्हणून जेव्हा आपण ‘राम’ नाम उच्चारतो तेव्हा त्यातील अग्नी आपली पापं जाळून टाकतो, त्यामधील सूर्य अज्ञानाचा अंधकार नाहीसा करतो आणि त्यामधील चंद्र आपले मन शांत करतो. – बाबा
राम नाम हा ह्या कलियुगासाठी तारक मंत्र आहे. रामाची ही भजने अत्यंत भावपूर्णतेने म्हणताना, आपली हृदयं भगवत् नामाच्या दिव्य स्पंदनांनी निनादून जावोत.