खजिन्याचा शोध (ट्रेझर हंट)
उद्देश्य :-
मुलांनी सदैव चांगल्या मानवी मूल्यांच्या शोधात असावे आणि ही मूल्ये स्वतःमध्ये रुजविण्यास सदैव उत्सुक असावे.
संबंधित मूल्ये:-
- उत्सुकता
- दृढ निश्चय
- जागरूकता
साहित्य:-
सकारात्मक मूल्ये (उदा.-प्रेम, सेवा इ.) लिहिलेल्या चिठ्ठया .
खेळ कसा खेळावा:-
- एका चिठ्ठीवर सकारात्मक मूल्य लिहावे व गुरूने ती चिठ्ठी खोलीमध्ये कुठेतरी लपवून ठेवावी.
- एका मुलाला ही चिठ्ठी शोधण्यास सांगावे
- ते मूल त्या मूल्याच्या (म्हणजे त्या चिठ्ठीच्या) जवळ किंवा आसपास पोहोचल्यास बाकीच्या मुलांनी- ‘हिरवा’ असे ओरडावे.
- ते मूल त्या विशिष्ट जागेपासून दूर जाऊ लागल्यास बाकीच्या मुलांनी- ‘लाल’ असे ओरडावे.
- त्या मुलास जर ते मूल्य ( म्हणजे ती चिठ्ठी) शोधता आली नाही तर दुसऱ्या मुलास संधी द्यावी.
- आणि जर ती चिठ्ठी सापडली तर गुरूंनी ती चिठ्ठी मुलांच्या नकळत दुसऱ्या ठिकाणी लपवावी.
- अशा प्रकारे खेळ चालू ठेवावा आणि विजेत्यांना गुण द्यावेत!!