भगवान श्री सत्यसाई अष्टोत्तर शतनामावली
भगवान बाबांची स्तुती करणाऱ्या पवित्र अशा १०८ नामरूपी पुष्पांची ही माला आहे. प्रत्येक नाम त्यांच्या अनंत दैवी गुण आणि दैवी शक्ती यामधील एकाचे वर्णन करते. या १०८ पवित्र नामांमधील प्रत्येक नामाची सुरुवात ‘ॐ श्री साई’ ने होते व शेवट ‘नम:’ या शब्दाने होते. हे चार शब्द काय दर्शवितात?
ओम
हा प्रथमध्वनी आहे. जो संपूर्ण निर्मितीमध्ये घडणाऱ्या सर्व बदलांमध्ये (तसेच योगाभ्यास करत असताना मनुष्याच्या
पृष्ठमज्जारज्जुमध्ये) शाश्वत असतो. ओम म्हणजे परब्रह्माचेा म्हणजे भगवान बाबांचा परिचय करून देणारा नाद.
श्री
त्याचे संपूर्ण वैभव
नमः
दोन्ही हात जोडून ‘नतमस्तक’ होणे, हाताची दहा बोटे जुळविणे व दहा इन्द्रियांचे (आंतरिक व बाहय) भगवंताला शरण जाणे. बाबांनी सांगितल्यानुसार ‘नमः’ हे एका मानसिक निश्चयाने केले पाहिजे की न मम, ‘माझे नाही परंतु तुझे आहे. ‘नमः’ ही आंतरिक शरणागतीची बाह्य अभिव्यक्ती असली पाहिजे.
[Source: श्री सत्यसाई बालविकास प्रायमर II – गट II साठी – श्री सत्यसाई बुक्स अँड पब्लिकेशन ट्रस्ट]
ओम
पठण करताना प्रत्येक नामाची सुरुवात ओमने होते. जो आद्य ध्वनी आहे आणि ज्याच्यामधून संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली, विश्वातील सर्व ध्वनी या आद्यशक्तीच्या केवळ लहरी आहेत आणि म्हणून हा ध्वनी अतिशय पवित्र मानला आहे. याच कारणासाठी ओम त्या परब्रह्माचे अथवा सर्वव्यापी सर्वश्रेष्ठ वैश्विक चैतन्याचे प्रतीक मानले गेले आहे. याला ‘प्रणव मंत्र’ म्हणतात, आध्यात्मिक महत्व आणि शक्ती असलेले हे पवित्र अक्षर आहे.
श्री
‘श्री’ हे अक्षर दिव्यत्वामधील मांगल्याचे सूक्ष्म सौंदर्य, मोहकता आणि आकर्षकता दर्शविते. वा अक्षरामधून कोणत्याही देवामधील अथवा देवतेमधील आध्यात्मिक प्रकटीकरण आणि शक्ती यांचे तेजही दर्शविले जाते.
साई
‘सर्वेश्वर, निर्माता अथवा निर्मितीचा जनक यांना ज्याच्याद्वारे दर्शविले ते ‘सा’ हे अक्षर आणि शक्ती किंवा निर्मितीची ऊर्जा अथवा निर्मितीची जननी यांना ज्याच्याद्वारे दर्शविले जाते ती ‘आई’ ही अक्षरे यांचे संयुक्त रूप म्हणजे ‘साई’. म्हणजेच ‘साई हे’ आजच्या भौतिक कल्याणाची तसेच आपल्यातील दिव्यत्वाचे सत्व जाणण्यासाठी आपण करत असलेल्या आध्यात्मिक प्रगतीची काळजी वाहणारे आपले जे दिव्य माता-पिता आहेत. त्यांचे मूर्त स्वरूप आहेत.
नमः
बोली भाषेत नमः म्हणजे ‘माझा नमस्कार’. नमःचा गर्भितार्थदेखील आहे आणि या सर्व पवित्र नामांच्या शेवटी नमः असल्याने हा गर्भितार्थच या ठिकाणी योग्य ठरेल. न म्हणजे नाही आणि म हे अक्षर मायेचे निदर्शक आहे. ज्या मायेमुळे मनुष्य स्वत:ला जडदेह समजतो आणि मग अज्ञान, दुःख, मृत्यु हे भौग त्याच्या वाट्याला येतात. म्हणजेच आपणही त्या परमोच्च सत्याचा अंश आहोत हे ओळखून त्या सर्वव्यापी, सर्वज्ञ आणि सर्वशक्तीमान परमेश्वरापुढे अहंकाराचे शरण जाणे हे नमः या शब्दातून दर्शविले जाते. अशा त-हेने या प्रत्येक पवित्र नामाच्या अंती आदर, नमन आणि शरणागती हे भाव येतात. अशा त-हेने आपल्या दृष्टीचा टप्पा उन्नत होऊन आपण भगवान श्री सत्य साईबाबांचा दिव्य महिमा जाणू शकू, यासाठी प्रत्येक नामाच्या आरंभी ‘ओम श्री साई आहे आणि आपल्यामध्ये आदर.नम्रता व या युगातील अवताराच्यापुढे शरणागती हे भाव निर्माण व्हावेत म्हणून प्रत्येक नामाच्या अंती ‘नमः’ आहे. पुढील नामावलीतील प्रत्येक ओळीचे पठण आपल्याला या भावाने करायचे आहे.
[Source : http://www.ssso.net/108/ ]
ओम
असे दिसून येते की सर्व १०८ नामांची सुरुवात ‘ओम’ या अक्षराने (जो प्रणव आहे, वैश्विक नाद आहे) होते आणि शेवट ‘नमः’ ने होतो, हा प्रणवनाद इतर सर्व नामांचा आधार आहे, ओम विना असलेला मंत्र किंवा नाम (नामावली) हे गोळी विना असलेल्या बंदुकीप्रमाणे आहे.
श्री
‘श्री’ म्हणजे त्याचे संपूर्ण वैभव
नामावली
मध्ये असलेले नाव हे त्याच्या एखाद्या अंगाचे किंवा गुणाचे अथवा एखाद्या प्रसंगाचे वर्णन आहे. १०८ नामांच्या या मालेवरील प्रेरणादायी भाष्य पहायचे असेल तर या विभागातील पहिला संदर्भ पहा.
नमः
‘न’ म्हणजे नाही. ‘म’ हे अक्षर मायेचे निदर्शक आहे. ज्या मायेमुळे मनुष्य स्वतला जडदेह समजतो आणि मग अज्ञान, दुःख, मृत्यु हे भोग त्याच्या वाट्याला येतात. म्हणजेच आपणही त्या परमोच्च सत्याचा अंश आहोत हे ओळखून त्या सर्वव्यापी, सर्वज्ञ आणि सर्वशक्तीमान परमेश्वरापुढे अहंकाराचे शरण जाणे हे ‘नमः’ या शब्दातून दर्शविले आहे. ‘नम:’ हे या मानसिक निश्चयाने केले पाहिजे को ‘माझे नाही परंतु तुझे आहे’ (न मम).
या स्पष्टीकरणाची दुसरी बाजू असे सुचविते की सर्वांनी परमेश्वराची निष्काम भक्ती करावी. कारण भक्तांसाठी काय
कल्याणकारी आहे ते परमेश्वराला माहीत असते. ‘I’ ‘ला (अहंकाराला, मीपणाला) आडवा छेद दिला पाहिजे आणि त्या ‘नमः ‘ मध्ये ‘मी’ ‘ला संपवून टाकले पाहिजे. ज्या भगवंतासमोर आपण हात जोडून नतमस्तक होतो त्याच्या चरणांवर आपण आपली कर्मे , ज्ञानप्राप्तीची सर्व साधने आणि सर्व जाणीवा अर्पण केल्या पाहिजेत. उजवा तळहात ‘तत्’ (ते दृष्टीच्या अगोदर असे मूलभूत वैश्विक तत्व जो पूर्ण आहे म्हणजे परमात्मा) आणि डावा तळहात म्हणजे ‘त्वम्’
(दृष्टीगोचर, विशिष्ठ, मर्यादित असे किंवा लाट अथवा प्रतिमा असावी तसे म्हणजेच जीवात्मा), जेव्हा हे दोन्ही तळवे एकत्र आणून जोडले जातात आणि त्यांचा एकमेकांना स्पर्श होतो तेव्हा या कृतीमधून ते’ आणि हे’ म्हणजे ‘तत्’ आणि ‘त्वम्’ यांची एकरूपता दर्शविली जाते. ‘अहं ब्रह्मास्मि’ म्हणजे जीवात्मा हाच परमात्मा आहे याचेच हे प्रतिक आहे.
१०८ का?
१०८ हा अंक पवित्र आहे कारण मनुष्य दिवसातून २१६०० (२००X १०८) वेळा श्वास घेतो आणि १०८ मधील सर्व अंकांची बेरीज केली असता ९ अंक येतो (१+0+८=९). ९ हा परब्रह्माचा अंक आहे. १०८ किंवा १००८ वेळा नावे हे शास्त्रांमध्येही सांगितले आहे. कारण या नामावलीचे पठण करताना कमीत कमी एखादे नाव तरी आपण अगदी मनापासून परमेश्वराच्या तळमळीने म्हणू आणि तो ‘भगवंत त्याना प्रतिसाद देऊन आपल्याला आशीर्वाद देईल.
[source: http://www.sathyasai.org/devotion/meditation.html ]
भगवान बाबांची ‘आई’ म्हणजे ईश्वरांबाने पुत्रप्राप्तीसाठी ओळीने अनेक वेळा सत्यनारायण व्रत केले होते. म्हणून त्यांचे नाव ‘सत्यनारायण’ ठेवण्यात आले, चौदाव्या वर्षापर्यंत त्यांना सर्व जण ‘सत्या’ म्हणून हाक मारत. त्याच वेळी म्हणजे चौदाव्या वर्षी त्यांनी ओळखले की आता हे सांगण्याची वेळ आली आहे की ते दुसरे तिसरे कोणी नसून ते म्हणजे साईबाबाच परत आले आहेत, साई बाबा म्हणून त्यांचे पूजन केले पाहिजे. लाखो लोक त्यांना साईबाबा किंवा ‘सत्य’ साई बाबा (खरे साई बाबा) म्हणून ओळखतात. साई म्हणजे स्वामी, नाथ, (शाही, शाह, पातशहा, साही, सायो, साई), ‘स’ म्हणजे सर्वेश्वर, सर्वोच्च. ‘आई’ म्हणजे माता, ‘बाबा’ म्हणजे पिता, असाही साई बाबा’ शब्दाचा अर्थ करता येईल, नमः म्हणजे दोन्ही हात जोडून नतमस्तक होणे, हाताची दहा बोटे जुळविणे व दहा इन्द्रियांचे (आंतरिक व बाह्य) भगवंताला शरण जाणे. बाबांच्या सांगण्याप्रमाणे नमः हे या मानसिक निश्चयाने केले पाहिजे की ‘न मम’, ‘माझे नाही पण तुझे आहे’, नमः हा आंतरिक शरणागतीची बाह्य अभिव्यक्ती असली पाहिजे, तज्जपस्तदर्थ भावनम् ते पुन:पुन्हा म्हणा आणि त्याच्या अर्थावर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक नावाच्या आधी ‘ओम श्री’ म्हणायचे आहे. कारण ओम हा प्रथम ध्वनी आहे. जो संपूर्ण निर्मितीमध्ये घडणाऱ्या सर्व बदलांमध्ये (तसेच योगाभ्यास करत असताना मनुष्याच्या पृष्ठ मज्जरज्जुमध्ये शाश्वत असतो.
ओम म्हणजे परब्रह्माचा म्हणजेच भगवान बाबांचा परिचय करून देणारा नाद.
‘श्री म्हणजे त्याचे संपूर्ण वैभव’.
[Source: प्रो.एन कस्तुरी यांच्या – ऑफ १०८, प्रेशस जेम्स, अष्टोदर शतनाम रत्नमाला’ यामधून]
नमः
‘स्वामींनी सांगितल्याप्रमाणे नमः या शब्दाचा अर्थ लक्षात घेऊन आपण हे म्हटले पाहिजे, स्वामी म्हणतात ‘नमः म्हणजे न मम, माझे नाही परंतु तुझे आहे. ज्याप्रमाणे शरणागती दर्शविण्यासाठी ‘दाय विल बी डन’ म्हणजे तुझ्या इच्छेप्रमाणे व्हावे. असे खिश्चन धर्मात म्हणतात. प्रत्येक गोष्ट त्याचा कृपाप्रसाद समजून स्वीकारून कृतज्ञतापूर्वक त्याला प्रार्थना करून आपण आप ले प्रेम आणि आदर परमेश्वराला अर्पण करावे.
श्रीकृष्ण भक्त अक्रूर हे अशा प्रकारच्या भक्ताचे प्रसिद्ध उदाहरण आहे. ज्याने भगवान श्रीकृष्णाला सतत दंडवत प्रणाम करून आणि विशुद्ध मनाने आणि विनम्रतेने वंदन करून आपले जीवन पवित्र केले, वंदनम् म्हणजे केवळ दोन्ही हात जोडून नमस्कार करणे नव्हे. दोन्ही हातांची दहा बोटे ही पाच ज्ञानेंन्द्रिये आणि पाच कमेन्द्रियांदवारे जी कर्मे केली आहेत ती सर्व परमेश्वराला अर्पण करणे, परमेश्वरी इच्छेपुढे संपूर्णपणे शरण जाणे या भावाने अक्रुराने ‘भगवंताची भक्ती केली, म्हणून त्याला त्याच्या दृष्टीसमोर सतत परमेश्वर दिसत असे.
जोडलेले हात आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचे स्मरण करून देतात, उजवा तळहात त्या सवोच्च, सर्वव्यापी चैतन्याचा निर्देशक आहे. ज्याला आपण परमेश्वर म्हणतो आणि उपनिषदे त्याला ‘तत्’ म्हणजे ते म्हणून संबोधतात. डावा तळहात ‘त्वम् म्हणजे मर्यादित जीवात्मा ‘मी ‘चा निर्देशक आहे. यामधून आपल्याला याचे स्मरण होते की जीवात्मा आणि परमात्मा यांचे मिलन हे आपल्या आध्यात्मिक जीवनाचे अंतिम ध्येय आहे. ‘तत त्वं असि’ ‘ते तू आहेस किंवा मी आणि तो एकच आहोत.
[Source: श्री सत्य साई सेवा संघटना ,यूके में २००६: प्रार्थना आणि दंडवत प्रणाम, यामधून ]
तुम्ही जो एक नमस्कार कराल तो भक्तीभावाने करा. हे पुरेसे आहे. पण तुम्ही तेवढेही करत नाही. एक नमस्कार तुम्ही अगदी भावशून्यतेने, उदासीनपणे एखाद्या स्वयंचलित यंत्राप्रमाणे करता. जेव्हा तुम्ही तुमचे दोन्ही हात जोडता तेव्हा तुम्ही मनामध्ये असा भाव आणा की तुमची दहा बोटे त्या पाच कर्मेन्द्रियांची आणि पाच ज्ञानेन्द्रियांची निर्देशिक आहेत. त्यांच्याद्वारा केलेली सर्व कर्मे तुम्ही परमेश्वराच्या चरणी अर्पण करत आहात, परमेश्वराच्या चरणांना स्पर्श करणे. भगवंताला स्पर्श करणे हा नमस्काराचा हेतू आहे. आध्यात्मिक प्रवाह निर्माण होऊन तो तुमच्यामध्ये प्रवाहित होण्यासाठी मायाशक्ती हे ऋणभाराचे टोक आणि महाशक्ती हे धनभाराचे टोक यांचे मिलन झाले पाहिजे. -बाबा
[Source: http://www.saidarshan.org/cgi-bin/gems.cgi?50×14 ]