श्री सत्य साई आत्मोद्भव शिक्षण – पंच महाभूते
मानवी मूल्ये उचलून धरण्यासाठी मनुष्याला ही शरीराची देणगी मिळाली आहे अशी दृढ श्रद्धा विकसित करा.
मनुष्याच्या प्रत्येक कृतीमध्ये नैतिक मूल्यांचा अंतर्प्रवाह असावा.
भगवान श्री सत्य साई बाबांचे दिव्य प्रवचन, २२ नोव्हें १९९८
आत्मोद्भव शिक्षण हे २१ व्या शतकाचे वेद होय .
आत्मोद्भव शिक्षण म्हणजे मानवी मूल्ये पृष्ठभागावर आणणे. सत्य, धर्म, शांती, प्रेम आणि अहिंसा ही मूल्ये प्रत्येकात लपलेली असतात. ‘आत्मोद्भव’ शब्दाचा अर्थ जे तुमच्या अंतरात आहे ते बाहेर काढणे. ‘बाहेर काढणे’ म्हणजे ते कृतीत उतरवणे.
हे संपूर्ण विश्व पंच महाभूतांनी बनले आहे. ध्वनी, स्पर्श, रूप, रस, गंध ही त्यांची तत्त्वे आहेत. ही सर्व, सत -चित -आनंद रूपी, आदि स्रोत असलेल्या परमेश्वरापासून उदय पावली आहेत. आत्मोद्भव शिक्षणाचा पंच महाभूते, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, आणि मानवी मूल्ये यांच्याशी परस्पर संबंध आहे.