संकल्पना
शिक्षणाला पूर्णत्वाकडे नेणे म्हणजेच अनुभामात्मक अध्ययन. ते आतील संकलनाची तजवीज करते, ज्यामुळे शिक्षणातले कृत्रिम बांध नाहीसे होतात. दृकचमत्कारामागील विज्ञान मुलांना उमगते, जीवनातील अनुभव येते आणि सिद्धीस नेणाऱ्या उत्कृष्ट नमुन्याचे मर्म जाणता येते. अशा रितीने सत्यम , शिवम् आणि सुंदरम हे तीन्ही अनुभवजन्य अध्ययनाचे प्रमाण ठरतात. या सूक्ष्म दृष्टीला खोलवर मूल्ये बिंबविण्याचे महत्त्व आहे.
या दृष्टिकोनाचा दुहेरी हेतू आहे
- हे वर्गातील सर्व मुलांना सहभागी करून घेते. वर्गशिक्षक विषय निवडतात परंतु अनुक्रमाणिका आणि प्रयोगसंबंधित सर्व कल्पना मुलांकडून येतात. मुलांना एकदा त्यांची भूमिका समजली की ती सर्व माहिती गोळा करतात आणि त्यातून जे निपजते ते तुम्हांला पहावयास मिळते. जेव्हा मुले फक्त ऐकतात तेव्हा त्यांच्याकडून केवळ २० % च शोशले जाते. जेव्हा त्यांना चपळतेने त्यात गुंतविले जाते आणि त्यांना समजलेले ते बोलून दाखवितात तेव्हा शोषणाचे गुणोत्तर प्रमाण ७०% किंवा त्याहूनही अधिक असते. मुले प्रत्यक्षरित्या जे अनुभवतात, तेच ती आत्मसात करतात. ते ज्ञानच ती स्वतःचे म्हणवू शकतील. जे जिरविले जात नाही ते बाहेर फेकले, ओकले जाते (जसे हल्लीच्या परीक्षांमध्ये) श्री सत्यसाईंबाबांच्या सांगण्यानुसार पुस्तकी ज्ञान या प्रकारात मोडते. केवळ व्यवहार्य ज्ञानच मुलांना आत्मसात करता येते. हाच निव्वळ पांडित्यदर्शक लाभ आहे,
- दुसरे म्हणजे, एका विशिष्ठ विषयावर काम करतांना मुले एकत्र येऊन काम करतात.; त्यांच्यात सहयोग आणि परस्परानुकुल कार्याचा विकास होतो. ती कल्पनांची आणि कौशल्यांची देवाण घेवाण करतात. ज्यामुळे ‘वाटून घेणे’ हे मूल्य वाढीस लागते. ती मतैक्य विकसित करतात. ज्यामुळे लोकसत्ताक मुल्ये बिंबवली जातात. अशा रितीने सामूहिक कार्यक्रमांमार्फत ‘बरोबरीच्या गटाला’ (peer group) बराचसा पाठिंबा दिला जातो.