दैवी मार्गदर्शन
पद्धतशीर बनवलेल्या वेळापत्रकानुसार ठराविक वेळाने खात रहा, फिरत रहा आणि दिवसभरात विविध कार्य करत रहा; जेणेकरून त्यायोगे अन्न पचेल.
– भगवान बाबा -१२ ऑक्टोबर, १९६९- प्रशांती निलायम.
नावीन्य आणि आध्यात्मिकतेच्या नांवाखाली वैयक्तिक स्वच्छतेच्या प्राथमिक नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. स्नान करणे टाळतात. तोंडाच्या स्वच्छतेची, आरोग्याची काळजी घेत नाहीत. नुकसान करणाऱ्या सवयी मुलांना लागतात आणि त्या खपवून घेतल्या जातात. देहरूपी भौतिक हवेलीचे मुख हे प्रवेशद्वार आहे. जर प्रवेशद्वाराच वाईट असेल तर त्या घराबद्दल आणि त्यातील रहिवाश्यांबद्दल काय म्हणावे! अव्यवस्थित, पिंजारलेले खराब डोके आणि शरीर, अस्थिर आणि विस्कटलेले मन आणि बुद्धी दर्शवतात.
– भगवान बाबा -१६ ऑक्टोबर १९७४, प्रशांती निलायम.
“राजसिक अन्नाने भावनांचा प्रक्षोभ होतो. तामसिक अन्नाने आळस आणि झोप येते. सात्विक अन्नाने समाधान वाटते, पण त्यामुळे तुमचे विकार चेतवले जात नाहीत किंवा भावना तीव्र होत नाहीत.”
अन्न ग्रहण करण्यापूर्वी आपण कोणती प्रार्थना केली पाहिजे : दैवी मार्गदर्शक तत्वे ऎका. (खालील ध्वनी फित ऐका)