उपक्रम ३
वर्गात फ्रुटसॅलड बनवण्यासाठी गुरूंनी मुलांना मार्गदर्शन करावे आणि मदत करावी. हा उपक्रम करत असतांनाच प्रत्येक फळाचा उपयोग आणि फायदे याबद्दल चर्चा करावी. तसेच सर्व फळे एकत्र मिसळल्यावर कशी गोड आणि रुचकर चव बनते हे ही सांगावे. तसेच देवाने निर्माण केलेले विश्व कसे सुंदर आहे, हे समजावून सांगावे. आणि जेव्हां सर्वजण एकोप्याने व द्वेष न करता राहतात, तेव्हां हे जग राहण्यासाठी किती सुंदर ठिकाण बनते, ते स्पष्ट करावे. गुरूंनी पुढील गीत वर्गात शिकवावे.’ ऑल थिंग्ज ब्राईट अँड ब्युटिफुल ‘.(पाठच्या शेवटी ह्या गीत दिले आहे. )
All Things Bright And Beautiful
LYRICS:
All things bright and beautiful,
All creatures great and small,
All things wise and wonderful,
The Lord God made them all.
- Each little flower that opens,
Each little bird that sings,
He made their glowing colours,
He made their tiny wings.[All things bright…] - The purple-headed mountain,
The river running by,
The sunset and the morning,
That brightens up the sky.[All things bright…] - The cold wind in the winter,
The pleasant summer sun,
The ripe fruits in the garden,
He made them everyone. [All things bright…] - The tall trees in the greenwood,
The meadows where we play,
The rushes by the water,
To gather everyday. [All things bright…] - He gave us eyes to see them,
And lips that we might tell
How great is God Almighty
Who has made all things well. [All things bright…]
दातांची निगा
शक्य असल्यास गुरूंनी दंतवैद्यांना किंवा दंत महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला वर्गात बोलवावे. गट १ च्या विद्यार्थ्यांना दातांची निगा, स्वछता कशी राखावी, हे सांगावे.
उदाहरणार्थ – दात घासण्याची योग्य पद्धत, दातांतील फटी स्वच्छ करणे ( फ्लॉसिंग ), हिरड्यांची निगा इत्यादी.
चांगले पहा, चांगले ऐका, चांगले बना.
मुलांना पुढील मूल्यगीत शिकवा. ” Be careful little eyes what you see . “
पाठाच्या शेवटी या गीताचे शब्द दिले आहेत.
(‘ पौष्टिक किंवा अपायकारक अन्न ‘ उपक्रमाचे उत्तर )