ही मांजरासाठी आहेत
तो २४ नोव्हेंबर १९७२ चा दिवस होता. गोहाटीहून (आसामची राजधानी) भक्तांचा एक मोठा गट भगवानांच्या जन्मदिन समारंभासाठी पुट्टपर्तीस आला होता व आता त्यांची परत जाण्याची वेळ आली होती. बाबा त्यांना अत्यंत प्रेमाने विभूतिची पाकीटे वाटत होते. त्यांनी त्या गटातील लाखी नावाच्या एका मुलीस विभूती दिली व ते पुढे गेले आणि अचानक मागे वळून त्यांनी अजून काही पाकीटे त्या मुलीकडे टाकत म्हटले, “ही त्या मांजरीसाठी (ये बिल्ली के लिए)”. कोण ती भाग्यवान मांजर होती जिने बाबांची कृपा आपल्याकडे खेचून घेतली? त्या मांजराचे नांव होते मिंकी. एक दिवस पावसात लाखीने तिचा जीव वाचवला व तिला ऊब देण्यासाठी व खाऊ घालण्यासाठी घरी आणले. तथापि तिच्या मोठ्या बहिणीला मांजरे’ फारशी आवडत नव्हती. ही बला घरी आणून पाळल्याबद्दल तिने लाखीवर दोषारोप केला.
एकदा तिच्या बहिणीने रात्री काही पाहण्यांना भोजनासाठी आमंत्रित केले होते. मिंकी सर्व तयारीवर लक्ष ठेवून होती. मासळीने पूर्ण भरलेले ताट म्हणजे मांजरासाठी मेजवानीच! तिने त्याचा आस्वाद घेण्याचे ठरवले. एक माशाचा तुकडा घेऊन ती पळाली. मोठी बहिण लाखीवर कडाडली. लाखीने मिंकीची मान पकडली व तिला काठीने जोरात तडाखे मारले. मांजर वेदनांनी विव्हळत होती. अचानक देवघरातील व इतर ठिकाणी लावलेली बाबांचे फोटो हालू लागले व त्यातील दोन फोटो भिंतीवरून टेबलावर पडले. भूकंप झाला असावा ह्या कल्पनेने सर्वजण घराबाहेर धावले. हळूहळू लाखीच्या लक्षात आले की बाबांनी तिला प्राणयांप्रती दयाभाव जपण्याची शिक्षण देण्यासाठी हा मार्ग निवडला असावा. दोघी बहिणींच्या डोळ्यातून पश्चात्तापाचे अश्रू वाहु लागले लाखीने त्या थरथरणाऱ्या मांजरीस आपल्या मांडीवर घेतले व ती तिच्या पाठीवरून हात फिरवू लागली आणि मांजरीच्या अंगावरील केस सुगंधी विभूतीने आच्छादल्याचे तिच्या लक्षात आले. विभूतीच्या रुपाने बाबांचे सर्वव्यापकत्व आणि मांजराविषयी प्रेम घोषित झाले.
त्या मांजराला मारल्याबद्दल त्या स्त्रीला खूप वाईट वाटले. हुंदके देत तिने त्या मांजराला टेबलावर ठेवले. वेदना कमी करण्यासाठी मांजराने आपले शरीर जोरात हलवले. त्याचबरोबर विभूतीचे लोट त्यातून बाहेर पडले व त्याचा जाड थर टेबलावर जमा झाला. मी तुला गंभीर इजा पोहचवल्याबद्दल मला क्षमा कर प्रिय मिंकी. काही महिन्यांनी ती स्त्री पर्तीला गेल्यानंतर तिला बाबांकडून विभूती मिळाली आणि त्यांनी २ अतिरिक्त’पाकीटे तिच्या मांजरीसाठी दिली. ही दोन अतिरिक्त पाकीटे तुझ्या मांजरासाठी घे.
[Source : Lessons from the Divine Life of Young Sai, Sri Sathya Sai Balvikas Group I, Sri Sathya Sai Education in Human Values Trust, Compiled by: Smt. Roshan Fanibunda]