सद्सद्विवेकबुद्धी
उद्दिष्ट:-
परमेश्वर, पालक, गुरु आणि शिक्षक तुम्हाला योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करतात, म्हणून तुम्ही त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. ह्या उपक्रमातून मुलांच्या मनावर हे ठसवणे हे ह्या खेळाचे उद्दिष्ट आहे.
संबंधितमूल्ये
- जागरुकता
- स्मरणशक्ती,
- सद्सद्विवेकबुद्धी
खेळ कसा खेळावा
- मुलांना एका रांगेत उभे करावे.
- हा खेळ ‘आज्ञेचे पालन’ ह्याविषयी असल्याचे गुरुंनी मुलांना सांगावे.
- ह्या खेळाविषयी स्पष्टीकरण देताना गुरुंनी मुलांना सांगावे की ज्या आज्ञेच्या अगोदर, परमेश्वर/ आई/ बाबा/ गुरु/शिक्षक म्हणतात असे शब्द असतील केवळ त्याच आज्ञेचे पालन करावे.
- गुरु, परमेश्वर म्हणतो – “हस्तांदोलन करा.”
- आई म्हणते, “हसा” अशा आज्ञांचे पालन करावे.
- ह्याची दुसरी बाजू, जर केवळ “खाली बसा”‘ अशी आज्ञा असेल तर त्या आज्ञेचे पालन न करता मुलांनी उभे राहिले पाहिजे.
गुरुंना सूचना:
- गुरुंनी दिलेल्या आज्ञा मुलांमध्ये मूल्यांचे संवर्धन करणाऱ्या असाव्यात.
- गुरुंनी नकारात्मक आज्ञा देऊ नयेत.