धांदल म्हणजे नासाडी
एकदा शिवाजी महाराज एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर जाताना रस्ता चुकले. त्यानी एका टेकडीवर पडून सभोवार पाहिले तर त्याला जवळपावर एकही खेडे दिसेना .रात्र होत आली होती. त्या टेकडीवरुन त्यानी खाली उतरायला सुरवात केली तोच त्याला काही अंतरावर मिणमिणता प्रकाश दिसला. ते त्या दिशेने गेले व लवकरच एका झोपडीपाशी पोहोचले.
त्यांना मराठा शिपाई समजून झोपडीत असलेल्या म्हातारीने त्यांचे स्वागत केले. ते थकलेले व भुकेलेले आहे हे पाहून तिने त्यांना हातपाय, तोड धुवायला गरम पाणी दिले आणि आडवे पडायला घोंगडीही अथरली त्यांची पुरेशी विश्रांती झाल्यावर तिने एका थाळीत गरम खिचडी आणली व त्यांच्या समोर ठेवली, शिवाजीला इतकी भूक लागली होती की त्यांनी मोठा घास घेण्यासाठी घाईघाईने खिचडीत हात घातला, त्या गरम अन्नाने त्यांची बोटे भाजली आणि ताबडतोब त्यांनी हात झटकला. त्याबरोबर काही शिते जमिनीवर सांडली.
म्हातारीने काय झाले ते पाहिले आणि ती उद्गारली, “अरे पोरा, तूही तुझ्या मालकासारखाच उतावळा व अविचारी दिसतोस . म्हणूनच तुझी बोट भाजली आणि काही अन्नही सांडले.” शिवाजींना या उद्गाराची मजाही वाटली व आश्चर्यही वाटले “माझा मालक शिवाजी हा उतावळा व अविचारी आहे अस तुम्हाला का वाटत?” त्यांनी विचारले.
म्हातारी निरागसपणे स्पष्टीकरण देऊ लागली, “हे बघ बाळा, तुला दिसत नाही का? शिवाजी शत्रूष्या छोट्या छोट्या गडांकडे दुर्लक्ष करीत आहे आणि फक्त मोठाले किल्ले जिंकायचा प्रयत्न करीत आहे . जसा तुझ्या अधिरेपणानुळे तुझा हात भाजला आणि अन्नही जमिनीवर सांडलं तसाच शत्रूला नामोहरम करण्याच्या बाबतीत उतावळेपणामुळे त्याला चिंताही निर्माण होते आणि त्याच्या शूर सैन्यातील अनेक माणसंही गमावतो .तू प्रथम थाळीच्या कडेला घातलेला, थंड झालेला पातळ थर आधी लागला हवा होता आणि मग हळूहळू मधल्या ढिगाकडे यायला हवं होतं . त्याचप्रमाणे शिवाजीने सुद्धा आधी छोटे छोटे गड सर करून आपला जम बसवायला हवा होता. त्यामुळे त्याला मोठे गड झटकन आणि फारसं मनुष्यबळ न गमावता सर करायला मदत झाली असती” म्हातारीच्या बोलण्यातले तथ्य शिवाजी महाराजांच्या झटकन ध्यानात आले. कोणत्याही कामात धांदल करता कामा नये हे त्याना उमगले.’नीट विचार करा, उत्तम योजना आखा आणि पायरी पायरीने पुढे जा.’ हे त्याचे धोरण ठरले आणि या पद्धतीने शिवाजी महाराजांनी महान मराठा राज्य स्थापन करण्याचे आपले स्वप्न पूर्णतया साकार केले.
प्रश्न:
- धांदल नासाडीला कारण का ठरते?
- म्हतारीने शिवाजी महाराजांवर टीका केली तेव्हा ते रागावले का नाही?
- धांदल म्हणजे नासाडी यासबंधी तुमचा स्वतःचा अथवा तुम्ही ऐकलेला दूसरा कोणाचा अनुभव वर्णन करा.