तळहाताचा खेळ
उद्दिष्ट
हा एक मनोरंजक, चित्तवेधक खेळ आहे.
संबंधित मूल्ये
आत्मसन्मान (आदर)
इतरांमधील चांगले पाहण्याची दृष्टी.
आवश्यक साहित्य
प्रत्येक मुलासाठी १ कागद व १ पेन्सिल.
गुरुंसाठी पूर्वतयारी
काही नाही.
खेळ कसा खेळायचा
- गुरूने मुलांना वर्तुळ करून बसण्यास सांगावे.
- प्रत्येक मुलाने कागदावर आपले नाव लिहावे. व त्यावर तळहात ठेऊन पेन्सिलीने हाताच्या पंजाच्या ठसा (चित्र) काढावा. आउटलाइन काढावी आणि तो कागद पुढील शेजारच्या मुलाला द्यावा.
- पुढील मुलाने त्या ठसा उमटवलेल्या कागदावर त्या मुलाबद्दल काहीतरी चांगली गोष्ट किंवा गुण लिहावा व तो कागद पुढच्या मुलाला द्यावा.
- याप्रमाणे वर्गातील प्रत्येक जण प्रत्येक मुलाबद्दल काहीतरी चांगली गोष्ट त्याच्या कागदावर लिहिल आणि शेवटी त्या त्या मुलाच्या तळहाताच्या ठश्यावर त्या मुलाबद्दल लिहिलेली माहिती वर्गात वाचून दाखवली जाईल.