Significance
ज्ञानाचा उत्सव
जिझसच्या शिष्याहून अधिक आश्चर्य अन्य कोणालाही वाटले नाही जेव्हा त्यांनी ऐकले की ज्या मनुष्याला त्यांनी शुक्रवारी मृत झालेले पाहिले, तो रविवारी आजूबाजूस वावरत होता. जीझस पुन्हा पुन्हा त्यांच्यासमोर दिसू लागला. तेव्हा तेव्हा ते नाकारणे त्यांना शक्य नव्हते. जीझसच्या अंगावर ठोकलेल्या खिळ्यांच्या खुणांना हात लावल्यानंतर थॉमसचा विश्वास बसला. (जॉन २० : २४-२४) वास्तविक पुनरुत्थान म्हणजे सूळावर चढवलेल्या दुःखद घटनेचे, अखिल मानवजातीच्या विजयामध्ये परिवर्तन.
ईस्टरचे आध्यात्मिक महात्म्य
ईस्टर म्हणजे प्रकाशाची प्रार्थना होय. पुनरुत्थापित झालेल्या ख्रिस्तांची आम्ही प्रार्थना करतो. त्यांनी आम्हाला असत्याकडून सत्याकडे, अंधकाराकडून प्रकाशाकडे आणि मृत्युकडून अमरत्वाकडे घेऊन जावे.
मोक्षमार्गावर प्रत्येकाला स्वतःचा क्रॉस वाहून न्यायचा असतो. हा क्रॉस कार्मिक रुणांचा आणि चेतन, अवचेतन आणि अचेतन ह्या जाणिवेच्या विविध पातळ्यामध्ये खोलवर रुजलेल्या भौतिक प्रवृत्तींचा आहे.
जीझस आपल्याला हे करण्याचा उत्तम मार्ग सांगतो, “तुमचा क्रॉस हातात घ्या आणि गुरूंचे अनुसरण करा तरच तुम्ही खात्रीने जीवनाचा लढा जिंकू शकाल”. आपले प्रिय स्वामी आपल्याला हेच सूत्र सांगतात, “गुरूंचे अनुसरण करा, दुष्टाचा सामना करा. अखेरपर्यंत लढा आणि खेळ संपवून टाका.”
अहंकार नाहीसा झाल्यावर परमेश्वराचे पुनरुत्थान होते. हा ‘क्रॉस’ च्या शब्दाचा अर्थ आहे. ‘मी’ ला पूर्णपणे छेदून टाकणे. हे ख्रिस्ती धर्माचे सार आहे.
ख्रिश्चनांचा क्रॉस म्हणजे अहंकाराच्या निर्मूलनाचे प्रतीक आहे. जेव्हा आपण क्रॉसच्या मार्गावरुन, अहंकार निर्मूलनाच्या आध्यात्मिक मार्गावरून जीझसचे अनुसरण करण्याचे ठरवतो तेव्हा आपण क्रोध, लालसा, असूया, घृणा आणि देहासक्तिवर जगणाऱ्या आपल्या लहान ‘मी’ ला सुळावर चढण्याच्या तयारीत राहायला हवे आणि सत्य, धर्म, शांती आणि प्रेमाच्या तेजस्वी, अमर, आत्मतत्त्वाप्रत उन्नत व्हायला हवे. लोकांची हृदये प्रेमाने अंतर्बाह्य भरून राहावित.
ह्यासाठी परमेश्वर जगातील दुःख आणि वेदना स्वतःवर घेतो. परंतु जेव्हा तुम्ही सत्य जाणता तेव्हा तुमच्या असे लक्षात येते. परमेश्वरासाठी सुख-दुःख असे काहीच नसते आणि तुम्हालाही दुःख असण्याचे काहीही कारण नाही! अखिल विश्व म्हणजे प्रेमाचे नाट्य आहे. प्रेमासाठी तुम्ही दुःखी होता. सर्व काही प्रेम, प्रेम आणि प्रेमच आहे – तेथे दुःख आणि वेदनांसाठी कारणच नाही.
[सत्य साई बाबा – २५ डिसेंबर १७७०)]
कैथालिक लोक ईस्टरच्या आगोदर४० दिवस, प्रार्थना, भिक्षा देणे (दान) आणि उपवास करतात (ज्यास लेंट असे म्हटले जाते) अध्यात्मिक संघर्ष आणि स्वसुखाचा त्याग ह्याद्वारे, ज्या गुड फ्रायडेच्या दिवशी ख्रिस्ताला सुळावर चढवले, त्यादिवशी आपणही ख्रिस्ताबरोबर आध्यात्मिक मृत्यूसाठी स्वतःला तयार केले पाहिजे ज्यायोगे आपणही ईस्टरच्या दिवशी त्याच्याबरोबर उन्नत नवजीवन प्राप्त करू.