ईशा वास्यमिदं
ऑडिओ
श्लोकाचे बोल
ॐ ईशा वास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्।
तेन त्यक्तेन भुंजीथाः मा गृधः कस्यस्विद्धनम् ।।
अर्थ
महात्मा गांधी म्हणतात, ‘सर्व उपनिषदे व शास्त्र ग्रंथ यांचा जरी अकस्मात नाश झाला तरी यातील केवळ ही एकच प्रार्थना असेल तरीही हिंदूधर्म चिरंतन राहील.’ आपण या विश्वामध्ये जे जे पाहतो ते सर्व परमेश्वराने व्यापले आहे. म्हणून आपण ‘मी आणि माझे’ या संकल्पनेचा त्याग केला पाहिजे. जे काही आपल्याला मिळाले आहे त्याचा कृतज्ञापूर्वक स्वीकार करून ते आपल्या सहबांधवांबरोबर वाटून घेतले पाहिजे, लालसा व स्वार्थ या सारख्या भावनांपासून स्वत:ला दूर ठेवले पाहिजे. विश्वातील प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या मालकीची आहे हे ध्यानात ठेवले पाहिजे, ईश्वर हा सर्वव्यापी व सर्वांतर्यामी आहे याची निरंतर जाणिव ठेवावी असे सांगणारे हे उपनिषदातील २ श्लोक आहेत. आपण सर्व प्राणिमात्रांवर प्रेम केले पाहिजे. सर्वव्यापी, सत्यस्वरूप व सर्वप्राणिमात्र व वस्तुमात्र यांचे मूळ स्वरूप असलेल्या परमेश्वराप्रती शरणागत भाव ठेवला पाहिजे.
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 0