धर्मराज अत्यंत बुद्धीमान



पांडवांचा थोरला बंधु धर्मराज म्हणजेच युधिष्ठिर हा धर्माचे मूर्तिमंत स्वरूप मानला जात असे. महाभारतामध्ये असे अनेक प्रसंग आहेत ज्यामधून हे स्पष्ट दिसून येते. तथापि त्याच्या धर्मदेवतेशी भेटीतील प्रसंगात, एका विचित्र परिस्थितीत यमराज स्वतः समोर उभे राहिले.
एकदा जंगलामध्ये हिंडत असताना, पांडव तहानेने व्याकुळ झाले होते. त्यांच्यामधील सर्वात लहान सहदेव एका झाडावर चढला व थोड्या अंतरावर त्याला एक सरोवर दिसले. त्याने त्याच्या भावांना तेथेच प्रतीक्षा करायला सांगून तो सरोवराच्या दिशेने निघाला. तो सरोवरापाशी पोहोचला. त्याची तहान भागवून तो त्यांच्यासाठी सुरईमध्ये पाणी घेऊन जाणार होता. तो त्या सरोवरात उतरणार तेवढ्यात त्याला एक आवाज ऐकू आला. “थांब! मी ह्या सरोवराचे रक्षण करणारा एक यक्ष आहे. माझ्या; प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय तू पाणी पीऊ शकत नाहीस.” त्या हुकमी आवाजाकडे सहदेवाने दुर्लक्ष केले व त्याने गटागट पाणी प्यायले. तात्काळ त्याला गुंगी आली व तो सरोवराच्या काठावर मृत्युमुखी पडला.
थोड्या वेळाने नकुल आपल्या भावला शोधत तेथे आला. त्याच्या बाबतीतही तेच घडले आणि त्याचप्रमाणे अर्जुन आणि भीमही तेथे आले व मृत्युमुखी पडले.
अखेरीस, युधिष्ठिर तेथे पोहोचला. त्याचे चारही भाऊ मृत्युमुखी पडल्याचे पाहून तो भयचकित झाला.
सावकाशपणे तो पाण्यापाशी गेला. तेव्हा त्याला यक्षाचा आवाज ऐकू आला. धर्मराज त्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तेथेच थांबला. यक्षाने त्याला अनेक प्रश्न विचारले. त्यातील काही प्रश्न व धर्मराजाने दिलेली उत्तरे:
त्याच्या उत्तरांवर यक्ष खुश झाला व त्याने धर्मराजाला वर दिला. धर्मराजाने आपल्या चारही भावांपैकी एकास पुनर्जिवित करण्यासाठी निवडावे असे यक्षाने त्यास सांगितले. युधिष्ठिराने नकुलास निवडले.
“माझ्या पित्यास दोन पत्नी (राण्या) होत्या. मी जीवंत असल्याने, कुंतीमातेस तिचा एक पुत्र जीवित असल्याचे समाधान आहे. परंतु माद्रीमातेचे दोन्ही पुत्र मृत पावले आहेत म्हणून समतोल न्याय करण्यासाठी, मी नकुलला निवडले.” यक्षाचे तत्क्षणी यमराजात रुपांतर झाले. त्याने धर्मराजाच्या उदात्ततेची व बुध्दिमत्तेची प्रशंसा केली. त्याने सर्व पांडवांना पुनर्जीवित करुन यश आणि आनंद प्राप्त होण्यासाठी आशीर्वाद दिले.