मयूरध्वजाची भक्ती
एकदा अर्जुनाने अश्वमेध यज्ञ केला व त्यासाठी घोड़ा मोकळा सोडला. अश्वमेध यज्ञाच्या नियमाप्रमाणे मोकळा सोडलेला घोडा जर दुसऱ्या कोणी अडवला तर त्या व्यक्तीशी घोड्याच्या मालकाला लढाई करावी लागे आणि तो लड़ाई हरला तर आपले सर्व राज्य त्या विजयी वीराच्या स्वाधीन करावे लागे.
मयूरध्वज राजाने तो घोडा अडवला. घोड्याबाबत त्याला सर्व नियम माहिती होते. कृष्ण आणि अर्जुन घोड्याच्या शोधात आले तेव्हा त्यांना दिसले की मयूरध्वज राजाने घोडा अडवला आहे. मयूरध्वजाशी युद्ध करा वे की नाही याबाबत कृष्ण व अर्जुन विचार करीत होते. कृष्णाने अर्जुनाला सांगितले की मयूरध्वज हा सामान्य मनुष्य नाही. तो त्याचा मोठा भक्त आहे आणि त्याच्याशी लढणे हे अर्जुनाला सोपे नाही. अर्जुन म्हणाला की यज्ञाच्या नियमाप्रमाणे घोडा पकडणाऱ्या माणसाशी युद्ध करणे आवश्यक आहे. नंतर कृष्णाने अर्जुनाला युद्धाची आज्ञा दिली. अर्जुनाने मयूरध्वजाशी विविध प्रकारे युद्ध केले. पण आपल्या प्रतिस्पर्ध्याला हरवणे त्याला जमले नाही. त्या मुख्य आयुधाची – गांडीवाची सुद्धा मोडतोड झाली. अर्जुनाने कृष्णाला मदतीसाठी बोलावले. कृष्ण सुद्धा युद्धाला तयार झाला. मयूरध्वजाला कृष्णाचे सामर्थ्य माहिती होते. पण यज्ञाच्या नियमाप्रमाणे त्याला युद्ध करणे भागच होते, त्याने आपले प्रत्येक शस्त्र घेऊन, कृष्णाचे पवित्र नाव घेऊन त्याच्यावर सोडले. ते बाण इतके तीक्ष्ण आणि शक्तिमान् होते, की कृष्णही सैरावैरा धावायला लागला. श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शनचक्राचा उपयोग करावा म्हणून अर्जुन ओरडून सांगू लागला. पण कृष्णाने उत्तर दिले की मयूरध्वजावर अर्जुनाचे गांडीव किंवा कृष्णाचे चक्र यांचा काहीही परिणाम होणार नाही. अर्जुनाने ही गोष्ट फार गांभीर्याने घेतली नाही. त्याला वाटले की कृष्ण नीट युद्ध करीत नाही, तो थट्टाच करीत आहे. अर्जुनाने विचार केला की मयुरध्वज जर कृष्णाचा खरा भक्त असेल तर तो कृष्णा विरुद्ध युद्ध करीलच कसे? तेव्हा मयुरध्वज काही भक्त नाही पण कृष्णाला दाखवून द्यायचे होते की मयुरध्वज हा खरोखरच त्याचा निस्सीम भक्त आहे. तेव्हा कृष्ण आणि अर्जुन ब्राह्मण वेषाने मयुराच्या घरी गेले.
परंपरेप्रमाणे आलेल्या अतिथीचे स्वागत करून आतिथ्य करणे हे गृहस्थाचे कर्तव्य होते आणि या बाबतीत मयूरध्वजासारखा, चांगला दुसरा गृहस्थ नव्हता. जेव्हा त्याने पाहिले की दोन ब्राह्मण त्याच्याकडे येत आहेत तेव्हा त्याने ही राजवस्त्रे बदलून ब्राह्मणाला योग्य वस्त्रे परिधान केली. त्याने पाणी आणून अतिथींचे पाय धुतले आणि त्यांचा योग्य तो सन्मान केला व आपले आतिथ्य स्वीकारण्याची विनंती केली.
मयूराच्या भक्तीची प्रगाढता अर्जुनाला समजावी म्हणून त्यांची भेट घडविण्याचा बेत श्रीकृष्ण पुष्कळ दिवसांपासून करीत होता. जेव्हा मयूराने त्यांना आतिथ्य स्वीकारण्याची विनंती केली तेव्हा कृष्ण म्हणाला – “आम्हाला तुझेआतिथ्य स्वीकारायला वेळ नाही. एक संकट निर्माण झाले असून तुझी मदत हवी आहे. तुझ्या घराकडे येत असताना माझ्या मुलाला वाघाने गिळले आहे. आता आणि आता त्याचे फक्त अर्धे शरीर बाहेर आहे. आकाशवाणीने सांगितले की, तुला तुझा मुलगा हवा असेल तर मयूरध्वज राजाच्या शरीराचा अर्धा भाग वाघाला भक्ष्य म्हणून दे.'”
मयूरध्वजाने जेव्हा हे ऐकले तेव्हा अतिथीची सेवा करण्याची संधी मिळाल्यासारखे त्याला वाटले. त्यागातूनच अमरत्व मिळते हे त्याला चांगले माहित होते म्हणून तो शरीराचा त्याग करायला सिद्ध झाला. आपल्याला जे मानवी शरीर मिळाले आहे त्याचा परोपकारासाठी उपयोग करायचा असतो, हे त्याला माहिती होते. त्याला हे पण माहिती होते की हे मानवी शरीर एक ना एक दिवस पडणारच आहे. त्याने आपली पत्नी आणि मुलगा यांना बोलावले आणि तलवारीने त्याच्या शरीराचे दोन भाग करण्यास सांगितले. पत्नी आणि मुलाला वाटले की तो काही पवित्र कृत्य करीत आहे म्हणून त्याने सांगितल्याप्रमाणे करायला ते तयार झाले. डोळ्यांची पापणी न हलवता कृष्ण आणि अर्जुन हे सर्व पहात होते. ते लक्षपूर्वक पहात असताना मयूराचा डाव्या डोळ्यातून अश्रू वहात असल्याचे त्यांना दिसले. परिस्थिती अधिकच गंभीर होत असताना कृष्णाला त्याची आणखी परीक्षा बघण्याची इच्छा झाली. तो म्हणाला – “डोळ्यात अश्रू आणून दुःखाने दिलेल्या देणगीचे काय मोल? मला असे दान नको. दान हे मुक्तपणे आणि स्वेच्छेने दिलेले असावे.” मयूर अविचल होता. तो म्हणाला – “शरीर देत असताना मला अजिबात वा वाटत नाही. जर मला काही दुःख वाटत असते तर माझ्या दोन्ही डोळ्यात अश्रू आले असते. हे आले असते. हे तू लक्षात घेतले पाहिजेस. एकाच डोळ्यात अश्रू का? या शरीराचे दोन तुकडे होत असताना त्यातील उजवा भाग पवित्र कार्यासाठी दान म्हणून घ्यायचा आहे तर डावा भाग अश्रू ढाळून रडतो आहे कारण तो टा कून दिला जाऊन केवळ कावळ्यांच्या मुखी पडणार आहे. अशा अपवित्र रीतीने तो फेकून दिला जाणार असल्याने तो रडत आहे.”
अर्जुनाने हे शब्द ऐकले आणि त्याला पश्चात्ताप झाला. त्याला समजून चुकले कि त्याला मिळालेला हा मोठा धडा आहे. त्याच्या लक्षात आले कि कृष्णाचे त्याच्यापेक्षाही जास्त निस्सीम भक्त आहेत. जगात निरनिराळ्या प्रकारचे भक्त असततात. पण मयूराची भक्ती अशा प्रकारची होती की, त्याने आपले सर्व काही – अगदी शरीरसुद्धा ईश्वराच्या पायावर ठेवले होते.
नंतरकृष्णाने मयूरध्वजाला आशीर्वाद दिला आणि स्पष्ट केले की राजाची प्रतिक्रिया पाहण्यासाठी त्याने ही छोटीशी परीक्षाच घेतली. त्याच्या शरीराचे तुकडे करायला तो तयार होता असे नाही तर एक कर्तव्य म्हणून कृष्णाशी तो युद्धभूमीवर लढला सुद्धा! अशा प्रकारचा मनुष्य हे जगात पूर्ण पुरुषाचेच उदाहरण आहे!
Narration: Ms. Sai Sruthi S.V.
[Sri Sathya Sai Balvikas Alumna]