संकेत आणि प्रश्नाच्या माध्यमाद्वारे व्यक्ती ओळख
उद्दिष्ट
हा खेळामध्ये मुलांनी जे सांगितले जाते ते लक्षपूर्वक ऐकणे आवश्यक आहे म्हणजे त्याला अनुरूप असणाऱ्या प्रश्न द्वारे आवश्यक माहिती काढून घेता येईल .त्या प्रश्नांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधातून योग्य त्या उत्तराचे अनुमान लावता येईल. त्यातून संतांच्या आणि थोर व्यक्तिमत्त्वांच्या जीवनाविषयी त्यांना किती माहिती आहे याचे मूल्यमापन करता येईल.</p
- संबंधित मूल्ये
- एकाग्रता
- स्मरणशक्ती
- लक्ष, ध्यान, अवधान
तयारी:
गुरुंनी काही चिठ्ठ्या तयार कराव्यात . प्रत्येक चिठ्ठीवर एखाद्या देवतेचे वा संतांचे वा थोर व्यक्तिमत्त्वाचे नाव लिहावे.
खेळ कसा खेळावा ?
- वर्गातील मुलांची दोन गटात विभागणी करावी.( गट अ आणि गट ब)
- गुरुंनी अ गटाला एक चिठ्ठी द्यावी. (समजा त्यावर स्वामी विवेकानंद हे नाव लिहिले आहे)
- अ गटातील एका मुलाने त्या नावाशी निगडित एक शब्द संकेत द्यावा.
- ब गटातील मुलांनी बुद्धी चतुर्याने प्रश्न विचारून नाव शोधावे.
- खेळाचा नियम असा आहे की प्रश्न असे असावे की ज्याची उत्तरे हो वा नाही या स्वरूपात देता येतील.
- गुरुंनी एखाद्या उदाहरणाच्या सहाय्याने खेळ खेळण्याचे स्पष्टीकरण द्यावे.
गट अ- संत
- गट ब – जिवंत वा मृत ( हा प्रश्न खेळाचा नियमात बसत नाही म्हणून अ गटास हयाचे उत्तर देण्याची गरज नाही )
- गट ब – जिवंत
- गट अ – नाही
- गट ब- संत उत्तर भारतातील आहेत का ?
- गट अ हो
- गट ब – स्त्री?
- गट अ – नाही
- गट ब – त्यांनी परदेशात प्रवास केला का ?
- गट अ-ही
- गट ब – ते बंगालमधील आहेत का? ह गट अ – हो
- गट ब – त्यांचे नांव संत विवेकानंद आहे का?
- गट अ – हो, बरोबर.
७ आता दोन्ही गटांची भूमिका बदलून खेळ सुरू ठेवावा
८. गुरूंनी ब गटास चिठ्ठी द्यावी म्हणजे अ गट त्या चिठ्ठीवरील नावाचे अनुमान लावेल.