पोस्ट बॉक्स
उद्दिष्ट
हा एक आगळा वेगळा आणि मनोरंअजक खेळ आहे.
संबंधित मूल्ये
वेगवेगळ्या धर्मांविषयी माहिती.
साहित्य
विविध धर्मांची कार्डस, ५/६/साबणांचे बॉक्स, एक लाकडी बोर्ड.
गुरुंनी करावयाची तयारी
प्रमुख धर्मांची माहिती देणारी वेगवेगळी कार्ड बनवावीत वा गोळा करावीत. (उदा.- धर्माचे नांव, संस्थापक, धर्मग्रंथ,सण, शिकवण, पवित्र स्थाने, महत्त्वाची प्रार्थनास्थळे इ.)
वेगवेगळ्या धर्मांची चिन्हे साबणाच्या रिकाम्या बॉक्सवर लावून ती एका बोर्डवर पोस्ट बाॕक्ससारखी चिटकवावीत.
खेळ कसा खेळावा
- गुरुंनी मुलांना २/३ गटांमध्ये विभाजित करावे.
- सर्व कार्डस पिसून एका गटाकडे द्यावीत.
- त्या गटाला दिलेल्या कार्डांच्या संख्येवर आधारित, मुलांना विचार करण्यास २ ते ३ मिनिटे द्यावीत.
- त्या गटातील मुलांनी योग्य त्या पोस्टबॉक्स मध्ये योग्य ते कार्ड घालावे.
- दिलेला वेळ संपल्यानंतर, त्यांनी योग्य पोस्टबॉक्समध्ये, योग्य कार्ड घातले आहे की नाही हे तपासावे आणि प्रत्येक योग्य कार्डास गुण द्यावेत.
- एका मागोमाग एक सर्व गटांनी हा खेळ खेळावा. ज्या गटास जास्तीत जास्त गुण मिळतील तो गट विजयी होईल.
बदल
प्रशांती निलयमचे चिन्ह असलेला एक बॉक्स – सर्व धर्मांचे सार – हे सुद्धा ठेवू शकता. – पुट्टपर्तीमध्ये साजरे होणाऱ्या ऊत्सवांची कार्डसही बनवू शकता (ईश्वरम्मा दिवस, शिवरात्री, आषाढी एकादशी इ.)