उलटी गिनती स्मरण
उद्दिष्ट:
‘उलटी गिनती’- हे खेळाचे नांवच सुचविते, की या सांघिक उपक्रमात, बालविकासमध्ये मुलांनी शिकलेल्या संकल्पनांची अनुक्रमिक सूची उलट्या क्रमाने सांगायची आहे. अशाप्रकारे नेमून दिलेल्या कार्यावर मुलांनी लक्ष केंद्रित केल्याने मुले संकोच करण्याची व मागे हटण्याची त्यांची सवय सोडून देतील. यामुळे त्यांची स्मरणशक्ती आणि श्रवणविषयक कौशल्य वाढीस लागतील.
संबंधित मूल्ये:
- स्मरणशक्ती
- एकाग्रता
- सतर्कता/सावधानता
- आत्मविश्वास
- समस्या निराकरण कौशल्य
पूर्वतयारी:
खाली दिलेल्या संकल्पनांच्या नावांच्या क्रमानुसार चिठ्या गुरू तयार करतील.
- ४ पुरुषार्थ
- ४ वेद
- ४ युगे
- ५ पांडव
- पंचप्राण
- पंचकोश (नावे)
- षड्रिपू
- दशावतार इत्यादी
खेळ कसा खेळायचा
- गुरु मुलांना जोड्या बनवायला सांगतील.
- गुरु एक उदाहरण देऊन हा खेळ कसा खेळायचा ते सांगतील.
- त्या प्रथम पहिल्या जोडीला पुढे बोलावतील व दोघांतील एका मुलाच्या हातात पुरुषार्थ असे लिहिलेली चिठ्ठी देतील.
- तो मुलगा याबद्दल धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे उत्तर देईल.
- त्याच्या / तिच्या जोडीदाराने तेच शब्द (उत्तर) उलट्या क्रमाने सांगायचे आहेत. उदा. मोक्ष, काम,अर्थ, धर्म.
- जर त्याला / तिला बरोबर उत्तर देता आले, तर त्या जोडीला गुण मिळतील.
- त्यांना जमले नाही, तर दुसऱ्या जोडीला संधी मिळेल.
- याचप्रकारे वर्गातील उरलेल्या सर्व मुलांसाठी खेळ पुढे चालू राहील.
बदल:
गट एकच्या मुलांसाठी अनुक्रमिक संकल्पनांमध्ये तीन शब्द येतील. (उदा. त्रिमूर्ती, त्रिगुण इत्यादी )
गुरुंसाठी सूचना:
बालविकास वर्गात हा खेळ वारंवार घेतला असता अगदी सहजपणे व मजेत खेळाच्या माध्यमातून या संकल्पना मुलांच्या लक्षात राहतील.