गीतांजली
उद्दिष्ट:
मजेत खेळल्या जाणाऱ्या या उपक्रमातून, गीतेचे आधी शिकलेले श्लोक आठवण्याची संधी मुलांना दिली जाईल, तसेच त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण होण्यास मदत करणे हा उद्देश आहे
संबंधित मूल्ये:
- उत्सुकता
- निरीक्षण
- एकाग्रता
- स्मरणशक्ती
- चिकाटी/ सावधानता
- अचूकता
- आत्मसमाधान
पूर्वतयारी
- गुरुंनी यासाठी गीताश्लोकांची निवड करावी
- गुरु पुठ्ठयांची वीस कार्डे तयार करतील. (खेळातील पत्त्यांच्या आकाराची )
- दहा कार्डांचा एक संच निळा तर दहा कार्डांचा दुसरा संच गुलाबी रंगाचा असेल
- गुरुंनी निवडलेल्या १० श्लोकांची पहिली ओळ १० निळ्या कार्डांवर लिहावी आणि त्याच श्लोकांची दुसरी ओळ गुलाबी कार्डांवर लिहावी.
- कार्डांच्या मागच्या बाजूला स्वामींचा फोटो चिकटवावा
- कार्डे रंगीत व आकर्षक दिसली पाहिजेत. ( यांत स्वामींच्या पॉकेट कैलेंडरची वीस कार्डे घेऊन त्यामागे सुध्दा श्लोक लिहिले तरी चालेल)
- एवढे झाल्यावर कार्डे तयार झाली.
खेळ कसा खेळायचा
- गुरुंनी कार्डे वर खाली पिसावी.
- नंतर गुरुने ती एका ओळीत पाच, याप्रमाणे ४ ओळीत मांडावी (कोठेही कोणताही रंग आला तरी चालेल)
- कार्डे अशा पद्धतीने ठेवावी की श्लोक लिहिलेली बाजू पाठीमागे असेल. (दिसणार नाही)
- एका वेळी चार मुले खेळ खेळू शकतील.
- प्रत्येक मूल एका वेळी २ कार्डे उचलेल त्यांतील एक निळे व एक गुलाबी असेल व श्लोकांतील दोन ओळी जुळत आहे का, ते पाहील.
- दोन्ही ओळी जुळल्या तर तो त्या मोठ्याने वाचेल व कार्डांची जोडी स्वतःकडे ठेवेल. आणि त्याला खेळण्यासाठी आणखी एक संधी मिळेल.
- जर श्लोकाची जोडी जुळली नाही, तर तो ती कार्डे इतर सर्व मुलांना दाखवेल आणि नंतर पुन्हा त्याच जागी ठेवेल.
- आता दुसऱ्या मुलाची खेळायची पाळी असेल. याप्रमाणे जोपर्यंत दोन्ही सेटमधील सर्व जोड्या जुळत नाहीत, तोपर्यंत खेळ पुढे चालू राहील.
काही बदल:
- गीता श्लोक व त्यांचा अर्थ अशा जोड्या घेता येतील.
- तसेच श्लोकांचा पहिला व शेवटचा शब्द घेऊन (२ कार्डांवर लिहून) हा खेळ खेळता येईल.
गुरुंसाठी सूचना:
पलब्ध वेळ व मुलांची कठिण समस्या सोडवण्याची क्षमता यानुसार गुरुंनी खेळात श्लोकांच्या किती जोड्या घ्यायच्या हे ठरवावे.