- कृष्णा रामा गोविंद नारायणा
- माधवा केशवा हरी नारायणा
- कृष्णा रामा गोविंद नारायणा
- श्री वेणूगोपाळ कृष्णा
- माधवा मधुसूदना नारायणा
कृष्णा रामा गोविंद नारायणा
भजनाचे बोल
अर्थ
नराच्या हृदयात वास करणारा नारायण हा रामही आहे, मुरलीधारी आणि मधू नावाच्या दैत्याचा वध करणारा गोविंदही आहे.
स्पष्टीकरण
कृष्णा रामा गोविंद नारायणा | कृष्णा रामा गोविंद आणि नारायण ह्या दैवतांचे आपण नामोच्चारण करतो जो सर्वांना मोहित करतो, जो सर्वव्यापी आहे, जो आपल्या सर्वांचे रक्षण करतो आणि आपल्या प्रवृत्ती शुद्ध करतो. |
---|---|
माधवा केशवा हरी नारायणा | माधवा, केशवा, हरी, नारायण ह्या नामांनी आपण भगवंताची स्तुती करतो. काळयाभोर केशकुंतलांनी सुशोभित झालेले त्याचे रूप अत्यंत विलोभनीय आहे. तो आपल्या आध्यात्मिक मार्गावरील सर्व अडथळे दूर करतो. |
कृष्णा रामा गोविंद नारायणा | कृष्णा रामा गोविंद आणि नारायण ह्या दैवतांचे आपण नामोच्चारण करतो जो सर्वांना मोहित करतो, जो सर्वव्यापी आहे, जो आपल्या सर्वांचे रक्षण करतो आणि आपल्या प्रवृत्ती शुद्ध करतो. |
श्री वेणूगोपाळ कृष्णा | मुरली वाजवणाऱ्या ह्या भगवंतास आम्ही विनम्रतेने अभिवादन करून, त्याचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करतो की त्याने आम्हाला अहंकाररहित करून मुरलीसारखे पोकळ बनवावे. ज्यायोगे तो आमचा त्याचे उत्तम साधन म्हणून वापर करू शकेल. |
माधवा मधुसूदना नारायणा | आपण परमेश्वरास माधवा, मधुसूदना, नारायणा ह्या नामांनी बोलावतो, ज्याने मधु नावाच्या दैत्याचा वध केला, जो विश्वाचा स्वामी आहे, विश्वव्यापी आहे, जो आपल्या मनातील इंद्रियजन्य सुखाच्या मोहाचा नाश करतो. |
राग: बागेश्री
श्रुती: डी (मध्यम)
ताल: कहरवा किंवा आदि तालम-८ ताल
Indian Notation
Adopted from : https://archive.sssmediacentre.org/journals/vol_11/01NOV13/bhajan-tutor-Krishna-Rama-Govinda-Narayana.htm