- पन्नग शयना कलि अवतारा
- नारायणा हरी ओम
- परम निरंजन नीरज नयना
- साईश्वराय हरी ओम
- बुद्धिप्रदायक पाप विनाशक
- सत्य सनातन तुम हो
- दीनानाथ हे प्रभू परमेश्वर
- करूणा सागर तुम हो
पन्नग शयना
भजनाचे बोल
अर्थ
भगवान विष्णु आदिशेषावर पहुडले आहेत. हे देवाधिदेवा! तुम्ही कलियुगाचे अवतार आहात. आम्ही ह्या राजीव लोचन देवाधिदेवाची भक्ती करतो! मूर्तिमंत निर्मलस्वरूप प्रभू साई! तुम्ही आम्हाला मुक्ती देणारे ज्ञान प्रदान करता, आमच्या पापांचा नाश करता. तुम्ही सत्य सनातन आहात. तुम्ही दीनजनांचे तारणहार आहात.
स्पष्टीकरण
पन्नग शयना कलि अवतारा | दिव्य आदिशेषावर पहुडलेल्या भगवंताची आम्ही आराधना करतो. हे प्रभू, तू आमच्या इंद्रियांचा स्वामी आहेस. मानवजातीचा उध्दार करण्यासाठी सांप्रत कालात, मानवी रूपात तू भूतलावर आला आहेस. |
---|---|
नारायणा हरी ओम | हे प्रभू, तू आदिम आहेस,अविनाशी आहेस आणि तू आमच्या आध्यात्मिक मार्गातील सर्व अडथळे दूर करणारा आहेस. |
परम निरंजन नीरज नयना | हे राजीव लोचन सत् चित् आनंद स्वरूप प्रभू तू परमश्रेष्ठ आहेस, निष्कलंक आहेस |
साईश्वराय हरी ओम | हे प्रभू साई! तू सर्वव्यापी आहेस, प्रणवस्वरूप आहेस |
बुद्धिप्रदायक पाप विनाशक | हे प्रभू! तू आम्हाला बुद्धी प्रदान करतोस आणि आमच्या पापांचा नाश करतोस. |
सत्य सनातन तुम हो | हे सत्यसाई प्रभो! तू मूर्तिमंत शाश्वत सत्य आहेस. |
दीनानाथ हे प्रभू परमेश्वर | हे प्रभू परमेश्वर, तू दीनजनांचा तारणहार आहेस. |
करूणा सागर तुम हो | हे प्रभू तू करुणेचा महासागर आहेस. |
राग: बहुतांशी कीरवानी रागावर आधारित
श्रुती: एफ # (पंचम)
ताल: कहरवा किंवा आदी तालम-८ ताल
Indian Notation
Western Notation
Adopted from : https://archive.sssmediacentre.org/journals/vol_12/01JUL14/Pannaga-Shayana-Kali-Avatara-radiosai-bhajan-tutor.htm