राष्ट्रीय पक्षी- मोर

Print Friendly, PDF & Email

राष्ट्रीय पक्षी- मोर

National Bird Peacock

  • भारतीय मोर- (पेव्हो क्रिस्टेटस) हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. तो रंगीबेरंगी, हंसाच्या आकाराचा पक्षी असून, त्याच्या माथ्यावर पिसांचा तुरा असतो. डोळ्यांखाली पांढरा टिपका असून, लांब बारीक मान असते.
  • या जातीतील नर मादीपेक्षा जास्त रंगीबेरंगी असून, त्याची छाती व मान चकचकीत निळ्या रंगाची’असते. कांस्य, हिरव्या रंगातील अतिशय नेत्रदीपक अशा सुमारे दोनशे पिसांनी बनलेला त्याचा मोठा पिसारा असतो.
  • मोराची मादी तपकिरी रंगाची असून ती नरापेक्षा आकाराने लहान असते व तिला शेपूट नसते.
  • माणसांतील कांही अतिशय स्तुत्य गुण मोरामध्ये सुद्धा आढळतात. आणि तो अखंडता आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. आपणही प्रयत्न केल्यास आपली सुप्त गुणवैशिष्ट्ये प्रकट करू शकतो.
  • हिंदू धर्मात मोराला मेघनाद, पाऊस आणि युध्द यांच्या देवाचे इंद्राचे प्रतीक म्हणून चित्रित करण्यात आलं आहे. दक्षिणेत मोराला भगवान मुरुगांचे, कार्तिकेयांचे वाहन मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *