श्री सत्यसाई अष्टोत्तरी

Print Friendly, PDF & Email
श्री सत्यसाई अष्टोत्तरी
उद्देश:

या उपक्रमात मुलांना साई अष्टोत्तरीतील नावे ओळीने आठवून जोरात म्हणून दाखवण्याची संधी मिळेल. हे म्हणताना त्यांना गंमतपण वाटेल.

संबंधीत मूल्ये:
  • भक्ती
  • स्मरणशक्ती
  • सतर्कता
  • संघ भावनेमध्ये वृद्धी
आवश्यक साहित्य:

एक चेंडू

गुरुंची तयारी:

काहीही नाही

कसे खेळावे
  1. गुरु मुलांना गोलात उभे करेल आणि एका मुलाच्या हातात चेंडू देईल.
  2. ज्या मुलाच्या हातात चेंडू आहे त्याने साई अष्टोत्तरीतील प्रथम नाम मोठ्या आवाजात म्हणून चेंडू दुसऱ्या मुलाचे नाव घेत त्याच्याकडे फेकायचा.
    उदा. ॐ श्री भगवान सत्यसाई बाबाय नमः
  3. दुसऱ्या मुलाने चेंडू पकडत दुसरे नाम ॐ श्री साई सत्यस्वरुपाय नमः म्हणावे
  4. पुढे त्याने तिसऱ्याकडे चेंडू फेकायचा
  5. हा खेळ जेवढा वेळ खेळण्यास उपलब्ध आहे तो पर्यंत ओळीने योग्य नावे घेत खेळत रहायचा.
  6. ज्या मुलाला किंवा मुलीला योग्य नाव म्हणता येणार नाही तो खेळातून बाद होईल.
गुरुंसाठी सूचना:
  • हा उपक्रम मुलांसाठी त्यांचा अभ्यास वाढवण्यासाठी गुरुंना उपयुक्त होईल.
  • हा उपक्रम अजून मनोरंजक करण्यासाठी मुलांना दहा नावांची सूची पाठ करुन म्हणायला सांगता येऊ शकते. त्याने त्यांचे परिक्षण करण्यास सोपे जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: